आवारभिंतप्रकरणात उपाध्यक्षांचे चौकशीचे पत्र,प्लबंरसह यांत्रिकीच्या प्रकरणात मात्र गप्प

0
12

गोंदिया,दि.१२- गोंदिया जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील सावळागोंधळाची लक्तरे वेशीवर टांगणारे वृत्त सतत दोन आठवड्यापासून बेरार टाईम्सने जनतेसमोर आणले आहे.त्यापैकी आवारqभत बांधकामाच्या पहिल्या प्रकाशित वृत्तानुसार बांधकाम विभागाची बदनामी होत असल्याने या सर्वप्रकरणाची चौकशी करुन कागदपत्र सादर करण्याचे पत्र जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती रचनाताई गहाणे यांनी कार्यकारी अभियंत्यांना दिले.
मात्र त्याच विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत प्लबंर भिवगेड व वरिष्ठ यांत्रिकी व कनिष्ट यांत्रिकी बागडे व शेख हे आपले काम न करता दुसरेच काम करुन शासनाच्या डोळ्यात धुळफेक करीत असल्याच्या वृत्तावर मात्र उपाध्यक्षांनी चुप्पी साधली आहे.त्यातच प्लंबर भिवगडे हा जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या गावचा असल्याने व तो पालकमंत्र्याच्या जवळ असलेल्या विशेष कंत्राटदाराचे पुर्णच काम करीत असल्यामुळेच त्याप्रकरणात चुप्पी साधली जात असल्याचे स्पष्ट होत असल्याने जिल्हा परिषदेतील पारदर्शक प्रशासनाचे वाटोळे निघाले आहे.त्यातच बांधकाम विभागात जे कर्मचारी नियुक्त केले जातात ते आपल्या पदावर काम करतात की नाही याची तपासणी कधीही सीईओच काय त्या विभागाचे प्रमुख अतिरिक्त सीईओ यांनीही केली नाही.
सोबतच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांना तर अशा गोंष्टीकंडे लक्ष द्यायला वेळ का नाही याबाबत मात्र बांधकाम विभागातच नव्हे तर वित्तविभागातही छुप्या आवाजात अध्यक्ष मॅडम बांधकाम विभागात चुकीचे काम करणाèयावर कारवाई करुच शकत नाही कारण युवक काँग्रेसच्या कार्यकत्र्यांच्या कामासाठी त्यांचा आग्रह राहत असल्याचे बोलले जात आहे.याच बांधकाम विभागात पंचायत समिती सडक अर्जुनी येथून बदलून आलेला कर्मचारी कोवे याला रुजू केल्यानंतर लगेच महिला बालकल्याण विभागाची मागणी म्हणून त्या विभागात पाठविण्याचा आदेश तयार करण्यात आला आहे.तर याच बांधकाम विभागातंर्गत येत असलेल्या आमगाव उपविभागातील एक कर्मचारी सुध्दा लघुपाटबंधारे विभागात प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आला आहे.एकीकडे पदस्थापना असलेल्यांना इतर विभागात पाठविण्याचा सपाटा सुरु असतांना प्लंबर,कनिष्ठ यांत्रीकी,वरिष्ठ यांत्रींकिना मात्र दुसरी कामे देऊन भष्ट्राचाराला चालना देण्याचे काम बांधकाम विभागाचे प्रमुख करीत आहेत.जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या यांत्रीकी विभागाला यांत्रीकी कर्मचाèयांची गरज असताना त्यांच्याकडे मात्र अद्यापही हे दोन्ही कर्मचारी वळते करण्यात आले नाही.
जिल्हा परिषदेतील सर्व वाहनांची देखरेख सध्याच्या घडीला यांत्रीकी उपविभागामार्फेत केली जात आहे.परंतु त्या विभागाकडे कर्मचारी नसल्याने आम्ही काहीच करु शकत नसल्याचे सांगितले जाते.या आधी पदाधिकारी यांना आपण यांत्रीकी कर्मचारी द्या जिल्हा परिषदेची वाहने जिल्हा परिषदेतच दुरुस्ती करुन देऊ असे एका अधिकाèयांने सांगितल्यानंतरही त्या पदाधिकाèयांनी केलेले दुर्लक्ष नव्हे तर प्लबंर व त्या यांत्रिकी कर्मचाèयांची पाठराखण करुन त्यांना त्यांच्या मूळ कामापासून दूर ठेवण्याचाच हेतू दिसून येत आहे.
बांधकाम विभागातील या सर्व गोंधळावर एकाही जिल्हा परिषद सदस्याकडून विभागाला धारेवर धरले जाईल अशी अपेक्षा सुध्दा कुणी करीत नाही,कारण प्रत्येकाचे कंत्राट कनेक्शन या विभागात त्या कर्मचाèयांशी जुळले असल्यामुळेच गेल्या दोन वर्षातच नव्हे तर गेल्या ८-१० वर्षापासून जिल्हा परिषदेचे वाटोळे करुन जिल्हा परिषदेएैवजी झोलबा पाटलाचा वाडा बनविण्याचे कामच लोकप्रतिनिधीसंह अधिकारी यांनी केल्यानेच अशा मुजोर व गैरव्यवहारातून माया जमविणाèया कर्मचाèयांना लाभदायक ठरल्याने विद्यमान पदाधिकारी,सीईओ,अति.सीईओ यांच्याकडून निष्पक्ष चौकशी व कारवाईची अपेक्षा करणे चुकीचे होणार आहे.