देऊटोला येथे कृषी दिन, कृषी प्रदर्शन व वृक्षारोपण

0
8

गोरेगाव,,दि.१२-: तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा देऊटोला येथे कृषी दिन कार्यक्रमानिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन हिराटोला येथील मनोहरभाई पटेल कृषी विद्यालयाच्यावतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाला पोलीस पाटील प्रतिमा मानकर, उपाध्यक्ष वामन निनावे, विठोाबा मानकर, देवका पटले, गुलाबचंद कटरे, डी.डी. बिसेन, जी.जी. ठाकरे, नंदेश्वर, बघेले उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य नंदेश्वर यांनी सेंद्रीय शेती कशी करावी त्याचे फायदे यांसंबधीची माहिती प्रात्याक्षीकाच्या माध्यमातून दाखविले.कृषी प्रदशनामध्ये जीवामृत, दशपर्णी अर्क, कडूqलब अर्क, बाभुळचा अर्क, पपई अर्क, सप्त धान्य, सॅजिवके, तंबाखू काटा, मेवा मिश्रण, पपई मिश्रण, गुळ अर्क, मिरची अर्क, हे सेंद्रीय पदार्थ ठेवण्यात आले होते. जे जंगलातील वेगवेगळ्या वनस्पती आणि घरात उपलब्ध असलेल्या पदार्थानी तयार केले होते. यावेळी वृक्षारोपणाचे आयोजन केले होते. यावेळी प्राचार्य नंदेश्वर, डी.जी. बिसेन आणि उपस्थित पाहुण्यांची वृक्षारोपण केले. कार्यक्रमाला राखी परिहार, qडपल कोरे, दिशा पटले, श्रद्धा इंगळे, वैशाली कोसरे, रश्मी पटले, दिपा नांदगये आणि कााजल गुरनुले आदि विद्यार्थिनीनी सहकार्य केले.
तालुक्यातील मनोहरभाई पटेल कृषी महाविद्यालयाच्या अंतिमवर्ष विद्यार्थिनींच्या एका गटाने प्रात्यक्षिक मोहिमेतंर्गत देऊटोला येथील जनावरांच्या लसीकरण मोहिमेतर्गंत लसीकरण केले.यामध्ये जनावरांना होणाèया घटसर्फ, एकटांग्या, पीपीर सारख्या आजारावरील औषधाचे लसीकरण गोरेगाव येथील पशुसंवर्धन विभागाचे पुशवैद्यकीय अधिकारी डॉ.सी.डी.जैतवार,आर.बी.पटले,वाय.सी.पाथोडे यांनी केले.पोलीस पाटील प्रतिमा मानकर,ग्रामपंचायत सदस्य देवका पटले,केवलचंद पटले,सुरेश कटरे व इतर नागरिक यावेळी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राध्यापक एस.पुरी यांच्या मार्गदर्शनात राखी परिहार, दिपा नांदगाये, वैशाली कोसरे, काजल गुरनुले, रुहानी मुसराम, दिक्षा पटले, qडपल कोरे, श्रध्दा इंगळे व रश्मी पटले यांनी सहकार्य केले.