जिल्हा परिषदेतजागतिक लोकसंख्या दिवस साजरा

0
9

गोंदिया,दि.१५ : जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून ११ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जि.प.अध्यक्ष उषा मेंढे अध्यक्षस्थानी होत्या. कार्यक्रमाचे उदघाटन उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले. प्रमुख अतिथी म्हणून जि.प.आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे, आरोग्य समिती सदस्य विजय लोणारे, खुशबू टेंभरे, श्रीमती वरखेडे उपस्थित होते.श्रीमती मेंढे म्हणाल्या, लोकसंख्या नियंत्रणासाठी उपलब्ध असलेले तात्पुरते उपाय म्हणून निरोध, गर्भनिरोधक गोळ्या, कॉपर-टी तसेच काही उपाय म्हणून पुरुष/स्त्री शस्त्रक्रीया इत्यादी साधनांचा अवलंब करावा असे आवाहन त्यांनी केले.
लोकसंख्येचा भस्मासूर नियंत्रित ठेवण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न करावे असे आवाहनही उदघाटक म्हणून श्रीमती गहाणे यांनी केले. श्री.कटरे म्हणाले, मुलगा किंवा मुलगी असा भेदभाव न करता मुलगी हीच खरी वंशाचा दिवा समजावा व गर्भलिंग निदान करु नये असे ते म्हणाले. श्रीमती वरखेडे यांनी देखील मार्गदर्शन केले.प्रास्ताविकातून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी जागतिक लोकसंख्या दिवसाचे महत्व पटवून दिले व आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती दिली.राष्ट्रीय कुटूंबकल्याण कार्यक्रमात पुरुष शस्त्रक्रियेमध्ये जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आल्याबद्दल जि.प.अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्याम निमगडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रमात महत्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल जि.प.अध्यक्ष उषा मेंढे, उपाध्यक्ष रचना गहाणे, आरोग्य व शिक्षण समिती सभापती पी.जी.कटरे यांचा मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात महत्वपूर्ण कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मानीत करण्यात आले. यावेळी कलापथकाद्वारे लोकसंख्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेल्या साधनांबाबत तसेच शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांबाबत जनजागृती करण्यात आली.कार्यक्रमाचे संचालन डॉ.बी.आर.पटले व डॉ.मीना वट्टी यांनी केले. आभार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बी.एन.चौरागडे यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने आरोग्य विभगाचे अधिकारी-कर्मचारी तसेच जि.प.च्या विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.