गोसेखुर्दचे दोन दरवाजे उघडले

0
12

भंडारा,दि.17-गोसेखुर्द सिंचन प्रकल्पाच्या बोगद्यांचे काम अखेरीस पूर्ण झाले असून धरणाची पातळी २४१.२०० मीटरवर आहे. डावा, उजव्या या दोन्ही कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून धरणाची दोन दारे अर्धा मीटरने उघडण्यात आली आहेत.
२२ एप्रिल १९८८मध्ये गोसेखुर्द धरणाची पायाभरणी झाली. तेव्हा पायथ्याजवळ पाणी वाहून जाण्यासाठी चार भूमिगत बोगद्यांची (कंडूळ) निर्मिती करण्यात आली होती. आज हे प्रकल्प पूर्णपणे तयार असून शासनाने पाणी अडविण्याची भूमिका घेतल्याने सर्वत्र जलसाठा निर्माण झाला आहे. धरणाच्या २४२ मीटरचा दुसरा टप्पा अर्थात २० टीएमसीचे उद्दिष्ट पूर्ण केले गेले होते. यावर्षी त्यात वाढ करून २४२.५०० मीटरपर्यंत पाणी साठविण्यात येणार आहे. मात्र धरणाच्या गेट क्रमांक ८,९ व १० वरील चार भूमिगत बोगदे बंद करावयाचे असल्याने धरणातील पाणीसाठा टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आले. तसेच धरणाचे ३३ वक्रद्वारे बंद करून आवश्यकतेनुसार पाणी आठ ते दहा दिवसांनी सोडले जात होते. वक्रद्वाराने पाणी अडवून बोगद्यांची कामे युद्धपातळीवर सुरू होती. आता चारही बोगद्यांची कामे पूर्ण झाली असून गेट क्रमांक एक व ३३ हे अर्ध्या मीटरने उघडली आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पात पाण्याचा साठा २४१.२०० मीटर आहे.