पोलिस वाहनाच्या धडकेने शिशु मंदीर संचालकाचा मृत्यू

0
8

कारंजा पोलिस मुख्यालय जवळील घटना 
गोंदिया,दि.१८:-गोंदिया ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत येणा-या ग्राम कारंजा येथील पोलिस मुख्यालया जवळ आज सकाळी 18जुलै मंगळवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास गोरेगाव वरून नागपूरला महाराष्ट एक्सप्रेस ने जाण्याकरिता निघालेल्या इसमाच्या वाहनाला गोंदिया एस.आर.पी.एफ च्या वाहनाने जबर धडक दिल्याने वाहनचालकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना घडली. व्यंकट नकटू पटले वय 46 वर्ष रा. गोरेगाव असे मृतकाचे नाव आहे. 
सविस्तर असे की गोरेगाव येथील सरस्वती शिशू मंदिर चे सचिव असलेले व्यंकट पटले हे नागपूरला काही कामानिमित्त जाण्यासाठी गोरेगाव येथून आपल्या दुचाकी वाहनाने निघाले दरम्यान कारंजा पोलिस मुख्यालया जवळ विरूद्ध दिशेने येणा-या गोंदिया एस.आर.पी.एफ. वाहन क्रमांक एम.एच. 21- एल -119 च्या चालकाने पटले यांच्या वाहनाला जबर धडक दिली यात धडकेत पटले यांचा जागीच मृत्यु झाला. या प्रकरणाची तक्रार ग्रामीण पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. मृतकाच्या कुटुंबियांना पोलिस प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी तसेच या घटनेतील दोषीवर कारवाई करावी अषी मागणी मृतकाच्या कुटंुबीयांनी केली आहे. विशेष म्हणजे व्यंकट पटले हे भारतीय जनता पक्षाचे गोरेगाव तालुकाचे सक्रीय कार्यकर्ते होते.