ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे -तारीक कुरेशी

0
6

लाखनी,दि.24-कार्यकर्त्यांनी पक्ष आणि संघटना वाढविण्यासाठी तयार राहण्यासोबतच येत्या लाखनी तालुक्यातील ५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सज्ज राहून ५१ ग्रामपंचायतीवर भाजपाची सत्ता स्थापन करण्याचे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष मो तारिक कुरेशी यांनी केले.ते लाखनी तालुका भाजपा तालुका कार्यकारिणी बैठकीच्या अध्यक्षस्थानी बोलत होते.साकोली विधानसभा विस्तारक राजेंद्र फुलबांधे यांच्या प्रमुख उपस्थितीत विवेकानंद सार्वजनिक वाचनालय सभागृहात ही बैठक आयोजित करण्यात आली होती.पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन साकोली विधानसभा विस्तारक प्रमुख राजेंद्र फुलबांधे यांनी केले.यावेळी म.वा. बोळणे, शिवराम गिरेपुंजे, पद्माकर बावनकर तालुकाध्यक्ष, नीरज मेश्राम महामंत्री, वर्षा रामटेके जि. प.सदस्य भंडारा, साधना वंजारी नगरसेविका, ज्योती निखाडे नगरसेवीका, विक्रम रोडे नगरसेवक, कौस्तुभ भांडारकर नगरसेवक, सुशीला भिवगडे नगरसेविका, फैजल आकबानी नगरसेवक, दिलवर रामटेके माजी सभापती पंचायत समिती लाखनी, जीवन बावनकुळे, प्रशांत गायधनी, विनायक मुंगमोळे, विनायक शेंडे, गिरीश निखाडे, प्रदीप रहांगडाले, रजनी पडोळे प स सदस्या, लाखनी, संदिप भांडारकर भाजयुमो महामंत्री यावेळी उपस्थित होते.या बैठकीचे सूत्रसंचालन संदीप भांडारकर आभार नीरज मेश्राम यांनी केले.