जिल्ह्यात दृष्काळ सदृश्य परिस्थिती;अध्यक्षासंह कृषी सभापती व सदस्य माऊंट आबूच्या सहलीला

0
13

खेमेद्र कटरे
गोंदिया,दि.०२- बळिराजासह सामान्य नागरिकांची होणारी आर्थिक परवड रोखण्यासाठी प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री राबराब राबत असताना गोंदिया जिल्हा परिषदेतील स्वपक्षाच्या कृषी सभापती मात्र आपल्या जिल्ह्यातील शेतकèयांना दुष्काळ सदृश्ङ्म परिस्थितीत वाèयावर सोडून सहलीचा आनंद लुटण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र आहे. अडचणीत आलेल्यांना मदत करण्याचे सोडून कृषी व पशुसंवर्धन सभापती यांनी आपल्या विभागातील अभ्यास दौèयाचा निधी इतर विभागाकडे वळता करून माऊंट आबू येथील सदस्यांच्या दौèयावर खर्च केल्याने त्या शेतकèयांच्या प्रश्नावर किती संवेदनशील आहेत, अशा चर्चांनी आता जिल्ह्यात वेग घेतला आहे.त्ङ्मामध्ङ्मे जिल्हा परिषदेच्ङ्मा अध्ङ्मक्षा व उपाध्ङ्मक्षा सुध्दा ङ्मात सहभागी झाल्ङ्माने ङ्मांना ङ्कक्त बैठकीत शेतकèङ्मावरील दिसून ङ्मेणारा अन्ङ्माङ्म हा ङ्कक्त देखावा असल्ङ्माचे बोलले जाते.त्यातच महाराष्ट्राबाहेर अभ्यास सहल घेऊन जायचे असल्यास विभागीय आयुक्तांची परवानगी घ्यावी लागते,मात्र संबधित विभागाकडे माहिती घेतली असता विभागीय आयुक्ताकडून परवानगीचा कुठेच पत्रव्यवहार झाला नसल्याचे सांगण्यात आले.
२९ जुर्ले रोजी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत राष्ट्रवादीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील पिकपरिस्थितीवर qचता व्यक्त करीत कृषी विभागाला सविस्तर सविस्तर निवेदन करण्याची मागणी केली. यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांनी सभागृहाला माहिती देताना जिल्ह्यात केवळ ३९६ मिमि पाऊस झाल्याची माहिती दिली. वास्तविक पाहता भाताच्या पिकाला यावेळी ६४४.०८ मिमि एवढी पाण्याची गरज आहे. यावर सभागृहात गंभीर चर्चा करण्यात आली.ङ्मा चर्चेच्ङ्मावेळी जि.प.अध्यक्षासह सर्व सभापती त्यामध्ये कृषी व पशुसवर्धन सभापती ङ्मा सुध्दा प्रत्ङ्मक्षात हजर होत्ङ्मा.संपूर्ण सभागृह शेतकèयांप्रती किती सजग आहे, याची प्रचती यावेळी आली.
देशात व राज्यातही अनेक भागात दुष्काळी परिस्थितीला घेऊन देशाचे प्रधानमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा qचतातूर असून जनतेच्या हितासाठी खर्चात काटकसर करण्यावर त्यांचा भर असतो. तर गोंदिया जिल्हा परिषदेतील त्यांच्याच पक्षाच्या कृषी व पशुसवर्धंन सभापती दुष्काळी परिस्थितीत शेतकèयांना वाèयावर सोडून अभ्ङ्मास दौर्याच्या नावावर परराज्यात सहलीचे आयोजन कसे काय करतात, यासंदर्भात संपूर्ण गोंदिया जिल्हा बुचकळ्यात पडला आहे.
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे कृषी समितीतील सदस्य आणि शेतकèयांसाठी अभ्यास दौèयाची तरतूद आहे. यामध्ये प्रत्येक वर्षी होणाèया अभ्यास दौèयासाठी जिल्हा निधीतून ४० हजाराची तरतूद केली जाते. मात्र, गेल्यावर्षी असा कोणताही दौरा करण्यात आला नसल्याने तो निधी अखर्चिक निधी दाखवून यावर्षीच्या निधीसह एकूण ८० हजाराचा निधी कृषी सभापती यांनी महिला व बालकल्याण विभागाकडे वळता केला.
वास्तविक हा निधी कृषी विकासासंदर्भाने होणाèया दौèयासाठी वापरायची परंपरा आहे. सदरहू दौरा कृषी समितीतील सदस्य आणि जिल्ह्यातील प्रगत शेतकरी यांच्यासाठी असतो. असे असताना कृषी सभापतींनी तो निधी शेतकरी हितसंबंधाने वापरायची अपेक्षा होती. जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. शेतकरी संकटात आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने भविष्यात गंभीर परिस्थिती ओढावण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना कृषी विकासावर हा निधी खर्च न करता त्याला अखर्चिक दाखवून इतर विभागाकडे वर्ग करणे आणि त्या निधीचा जिल्हा परिषद सदस्यांच्या सहलीसाठी वापर करणे, यावरून कृषी विभागाची शेतकèयांप्रती कशी आस्था आहे, हे स्पष्ट होत आहे. जिल्हा निधीतील या ८० हजाराच्या निधीतून जिल्ह्यातील अडचणीत सापडलेल्या काही शेतकèयांना मदत करणे सहज शक्य होते. असे केल्याने शेतकèयांच्या जखमेवर निदान फुंकर तरी घालता आली असती. जर हा निधी शेतकèयांसाठी वापरता आला असता तर कृषी विभागाची आणि पर्यायाने पक्षाची प्रतमा साहजिकच उंचावता आली असती.
देशात व राज्यात स्वपक्षाचे सरकार आर्थिक काटकसरीचे धोरण आखत असताना त्यांच्याच पक्षातील एका सभापतीने केलेले हे वर्तन म्हणजे पक्षीय धोरणाची खिल्ली उडविण्यासारखेच आहे, असे भाजपचेच कार्यकर्ते आता बोलत आहेत.
विशेष म्हणजे कृषी सभापतीच््या निर्देशानुसारच जिल्हा कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे यांच्या स्वाक्षरीने २७ जुर्ले रोजी कृषी विषय समितीची बैठक १ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येत असल्याचे बैठकीचे पत्र सदस्यांना पाठविण्यात आले.त्यानुसा या समितीचे सदस्य असलेले सदस्य भोजराज चुलपार हे मंगळवारला जिल्हापरिषदेत पोचले असता त्यांना सभापतीच्या कक्षात ठेकेदाराशिवाय कुणीच दिसले नाही.विशेष म्हणजे चुलपार यांना तर जि.प.सदस्यांची अभ्यास सहल गेली याचीही जाणीव नव्हती.जेव्हा सभापतींना ३० तारखेला सहल चालल्याची आधीच माहिती असताना निव्वळ एक महिन्ङ्माचा आत बैठक घेणे बंधनकारक असल्याचे निमित्त करुन त्या बैठकिचे पत्र काढण्ङ्माचे सोपस्कार मात्र व्यवस्थित पाळले.त्यातही ज्या जि.प.सदस्यांचा अभ्यास सहलीचा वारंंवार उल्लेख होत आहे त्यात शिक्षण सभापती यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही सदस्य सोडून सर्वच सहभागी झाले आहेत.
अभ्यास सहल परराज्यात नेण्यासाठी व सर्व सदस्य एकाचवेळी जात असतील तर विभागीय आयुक्तांची परवानगी आवश्यक असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले.यासंदर्भात प्रभारी मुकाअ मंगेश मोहिते यांना विचारणा केले असता त्यांनी मला याबाबत माहिती नाही,माहिती घेऊन कळवितो असे सांगितले.तर ज्या सामान्य प्रशासन विभागातून मुख्य पत्रव्यवाहर केला जातो,त्या विभागाच्या अधिक्षकांना विचारणा केल्यावर असा कुठलाच पत्र आजपर्यंत तरी गेले नसल्याचे सांगितले.सोबतच महिला बालकल्याण विभागातूनही अशाप्रकारचा कुठला पत्र विभागीय आयुक्ताकडे गेलेला नसल्याने विनापरवनागी परराज्यात अभ्यास सहल गेल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत असून विभागीय आयुक्त याप्रकरणात काय कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.