आमगावला नगरपरिषदेचा दर्जा,जि.प.अध्यक्षांचा मतदारसंघ बाद

0
13

गोंदिया,दि.03-गोंदिया जिल्ह्यातील आमगाव ला नगरपरिषदेचा दर्जा देण्यात यावे,यासाठी सुरु असलेल्या लढ्याला यश आले असून नगरविकास विभागाने २ ऑगस्ट रोज गोंदिया जिल्ह्यातील आमगाव या तालुका मुख्यालयी नगरपरिषद गठित करण्यात येत असल्याचे आदेश काढले आहे.या आदेशात नवनिर्माणाधिन आमगाव नगरपरिषदेमध्ये आमगाव,बनगाव,रिसामा,कुंभारटोली,पदमपूर,qकडगीपार,बिरसी व माल्ही या ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आलेला आहे.नव्याने अस्तित्वात आलेल्या आमगाव नगरपरिषदेमध्ये पदमपूर व रिसामा हे क्षेत्र सहभागी झाल्याने जिल्हा परिषदेच्या विद्यमान अध्यक्ष उषा मेंढे यांचे पद तसेच रिसामा जिल्हा परिषद क्षेत्राचे सदस्य सुखराम फुंडे यांचे पद हे आपोआप रद्द झाले आहे.या दोन्ही सदस्यांना आपले नव्या नगरपरिषदेच्या रचनेमुळे सदस्यत्व गमावण्याची वेळ आली आहे.आमगावला नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्याने तहसिलदार हे पहिले प्रशासक म्हणून लवकरच कामकाज हाती घेणार आहेत.