राष्ट्रपती पदक प्राप्त पोलिसांचा गौरव स्वातंत्र्यदिनी गुणवंतांचाही सन्मान

0
18

गडचिरोली,दि.16 : भारतीय स्वातंत्र्याचा आज 70 वा वर्धापन दिवस. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आयोजित मुख्य कार्यक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राष्ट्रपती पोलीस पदक मिळाले याबद्दल त्यांना सन्मानीत करण्यात आले. नक्षलचकमकीत शहीद झालेले जवान पोलीस नाईक दोगे डोलू आत्राम यांच्या पत्नी दोगे यांचा आणि शहीद पोलीस शिपाई स्वरुपकुमार अशोक अमृतकर यांच्या आई कल्पना अमृतकर यांचा पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तसेच अप्पर पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, पोलीस निरीक्षक प्रफुल प्रभाकर कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय रमेशराव रत्नपारखी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद रंगनाथ भिंगारे, सहाय्यक फौजदार मोतीराम बक्का मडावी यांनी पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत करण्यात आले.

याप्रसंगी नक्षली व पोलीस यांच्या जंगलात झालेल्या चकमकीत उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या जवानांना पोलीस शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये पोलीस उप-निरीक्षक दत्तात्रय भीमराव काळे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन माने, पोलीस हवालदार मल्लेश केडमवार, पोलीस नाईक जितेंद्र मारगाये, पोलीस शिपाई गजेंद्र सौंजाल या कर्मचाऱ्यांचाही याठिकाणी पालकमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत जिल्हास्तरीय बक्षीस वितरण कार्यक्रमात जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त तीन ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. यावेळी सरपंच/सचिव उपस्थित होते. प्रथम पुरस्कार रुपये 5 लाख धानोरा तालुक्यातील मौजा जांबळी, द्वितीय पुरस्कार प्राप्त रुपये 3 लाख कुरखेडा तालुक्यातील खरकाडा व तृतीय पुरस्कार रुपये 2 लाख कुरखेडा तालुक्यातील मौजा मालदुगी या ग्रामपंचायतीला प्रदान करुन पुरस्कृत करण्यात आले.

यावेळी 2016-17 या वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील स्काऊट गाईड अंतर्गत 05 कब व 10 बुलबुल ना चतुर्थ चरण व हिरकपंख राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये जिल्हा परिषद हायस्कूल सिरोंचा येथील विद्यार्थी बेनू मलय्या बुराम, आफताफ हकीम शेख, अदनान एस.अमित शेख, मोहम्मदकाई डी. ए. कलाम शेख, समिरसाहेब हुसेन शेख व महात्मा गांधी नगर परिषद गडचिरोली येथील विद्यार्थीनी निर्जरा सुरेंद्र बन्सोड, स्नेहा शेषराव रंधये, प्रांजली किरण नैताम, रश्मी संजय मेश्राम, किर्ती शुभाष जिगरबान, सानिया आनंद शेंडे, अंजली रेवाचंद बन्सोड, जेवा आदिल शेख, स्वाती राजेश्वर मेश्राम, रहेमत आरिफ फेनोगे या विद्यार्थ्यांना शिल्ड व पुष्पगुच्छ देऊन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले.