गोवारी व गोंड जमातीला घेऊन आंदोलन करणार-दादा हिरासिंग मरकाम

0
40

नागपूर,दि.16:- राजनीती विकासाची पुंजी आहे.गोवारी समाजाचे आंदोलन दादा हिरासिंग च्या स्टाईलने होईल. समाजाला धर्म,अर्थ व राजनीती समजणे गरजेचे असून गोवारी व गोंड जमातीला सोबत घेऊन आंदोलनाची दिशा ठरवावी लागेल, त्या करिता आपली सोच् बदलून संस्कृतीची रक्षा करा असे गोंडवाना गणतंत्र पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष दादा हिरसिंगजी मरकाम हे आदिवासी गोवारी सम्मेलनात बोलत होते.
आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती,गोंडवाना व आदिवासी गोवारी मिशन,देवरी यांच्या संयुक्त विद्यमाने दि.13 रोजी दुपारी 12 वाजता कुर्वेज न्यू मॉडेल हायस्कुल, सीताबर्डी शाखा येथील सभागृहात आदिवासींचे झुंझार नेते तत्कालीन आमदार क्रांतिवीर नारायनसिंग उईके यांचे 2017 हे जन्मशताब्दी वर्ष असून त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांचा कार्याला उजाळा देण्यासाठी खास आदिवासी गोवारी सम्मेलनाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी गोंडी संस्कृती दर्शक गोंगो पूजेचे आयोजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
मनुवादी मानसिकता आपल्याला न्याय अधिकार देत नाहीत शासनात आपले प्रतिनिधी व्होटिंग च्या माध्यमातून पाठविले पाहिजे.आपन संस्कृती व प्रकृती पूजक आहोत मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील आदिवासी गोवारी यांनी गोंडी धर्माची दिक्षा घेण्याची गरज आहे असे प्रतिपादन बाबा नाथेश्वर माजी उपाध्यक्ष मध्यप्रदेश गोंडवाना गणतंत्र पार्टी यांनी केले यावेळी शाम मरकाम,नारायणराव शाहारे नागपूर ;सुरेश कोहळे ;गोकुळ बोपचे ,क्रिष्णा सर्पा , आदिंचे समयोचित मार्गदर्शन होवून आपल्या समस्येला वाचा फोडल्या पाहिजे ,असे विचार यांनी मांडले.
कार्यक्रमाला विशेष अतिथी राष्ट्रीय महासचिव गोंडवाना गणतंत्र पार्टी चे श्याम मरकाम,आदिवासी गोवारी कृती समिती व मिशन देवरीचे अध्यक्ष कृष्णाजी सर्पा,नारायनजी सहारे,सुरेशजी कोहळे,गोकुलजी बोपचे,मनोहरराव शहारे,गोपालसिंह उईके,फुलचंद सोनवाणे,गिरधारीलाल भोयर सिवनी,मंगला ऊईके नागपूर इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक दामोदर नेवारे,संचालन रत्नेश कोहरू तर आभार शेखरभाऊ लसूनते यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्विते करिता रामेश्वर वाघाडे, निलेश सोनवाने, निलेश लसूनते,रुपेश चामलाटे, रत्नेश कोहरू, धनराज दुधकावरे,छतरु नागोसे,गजानन कोहळे, ताराचंद नेहारे आर्वी ,भुमेश्वर ठाकरे ;योगराज कोहळे ;पुरूषोत्तम वघारे ; तुषार राऊत ब्रम्हपुरी ,सचिन चचाणे ,विवेक चौधरी यवतमाळ ; आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले