मनोरा गावात टॅंकरने पाणी पुरवा खा. पटेलांचे जिल्हाधिकार्यांना निर्देश

0
11

गोंदिया,दि.17- जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील सरांडी जिल्हा परिषद गटातंर्गत येत असलेल्या मनोरा गावात आॅगस्ट महिन्यातच पाण्याची समस्या उदभवली असून गावातील 14 पैकी 11 विहिरी आटल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.त्या गावाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी बुधवारला भेट देऊन नागरिकांशी सवांद साधला असता पाऊस न पडल्याने या सर्व विहिरी कोरड्या पडल्याचे पटेलांना नागरिकांनी सांगितले.त्यावर लगेच खा.पटेल यांनी जिल्हाधिकारी यांना भ्रमणध्वनी करुन सदर गावात आपला जिल्हा जरी टॅंकरमुक्त असला तरी आजच्या घडीला टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन तत्काळ करावे असे निर्देश दिले.
गेल्या दोन महिण्यांपासून मनोरा, सेलोटपार, मुरमाडी, खैरी, मुरपार, नवेगाव, केसलवाडा, बयेवाडा, खोपडा या गांवात पाउस अत्यंत कमी प्रमाणात पडल्याने धान पिकाच्या 10 ते 15 टक्के रोवण्या झालेल्या आहेत. त्यातच पिण्याच्या पाण्यासाठी 1 कि.मी. पर्यंत पायपीट करावी लागत आहे.खा.पटेलांनी गावातील अनेक विहीरींची प्रत्यक्ष पाहणी करुन महिलांशी चर्चा केली.यावेळी उपस्थित असलेले तहसिलदार संजय रामटेके व खंड विकास अधिकारी इनामदार यांच्याकडे आपला रोष व्यक्त करीत प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली.
तिरोडा तालुक्यात यंदा आतापर्यंतची पावसाची स्थिती पाहाता दुष्काळ पडणार हे स्पष्ट दिसत आहे.यावेळी माजी आमदार दिलीप बंसोड, माजी जिल्हा उपाध्यक्ष पंचम बिसेन, पंचायत समिती सभापती उषा किंदरले, जिल्हा परिषद सदस्या सुनिता मडावी, सरपंच लता पेशने, जिल्हा परिषद सदस्य मनोज डोंगरे,प्रेमकुमार रहांगडाले, संजय किंदरले, पंचायत समिती सदस्या जया धावडे, मनोहर धार्मिक, महेंन्द्र मारवाडे, लिलाधर तिडके, विनायक सोनवाने, विनोद पेशने, सुभाष वाघाडे, गोपीका मारवाडे, कांता कावळे, ममता पेशने व ग्रामस्थ उपस्थित होते.