आमदार गजभियेंच्या नेतृत्वात भिक मांगो आंदोलन

0
16

नागपूर,दि.21 : सर्वधर्मीयांच्या उत्सवांसोबत, लग्न, वाढदिवस, आदीं समारोहात संगीत सूरांनी नागपूरकरांना थिरकण्यास बाध्य करणाऱ्या डी.जे. व्यवसायीकांवर भाजप शिवसेना सरकारने त्यांच्या व्यवसायावर बंदी आणल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आणल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या नेतृत्वात शहरातील शेकडो डी.जे.व्यवसायीकांनी झाशीराणी चौक, व्हेरायटी चौक व संविधान चौक येथे भिक मांगो आंदोलन केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या शासन काळात गोरगरीब जनतेला व्यवसाय करून आपल्या कुटूंबाचे उर्दनिर्वाह करण्यास कुठलीही अडचण होत नव्हती पण भाजप शिवसेना सत्तेत आल्यापासून गोरगरीब व्यवसायीकांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. याच्या निषेधार्थ आज झाशीराणी चैक येथे भाजप शिवसेना सरकारच्या विरोधात जोरदार नारेनिर्दशने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेेते आमदार प्रकाश गजभिये यांनी चक्क भिकेचा कटोरा घेत झाशीराणी चौक, व्हेरायटी चौक आणि संविधान चौकातील प्रवासी, दुचाकी वाहनचालक, चारचाकी वाहनचालक, पाईचालणारे, रिक्षाचालक, फुटपाथ दुकानदार यांना भिक मांगून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. भिक मांगो आंदोलनाव्दारे भिकेतून मिळलेले 4147 रूपये उपजिल्हाधिकारी श्री पडोळे यांच्या मार्फत मुख्यमंत्री निधीत जमा करून शेतकरी कर्जमाफीसाठी देण्यात आले.
यावेळी विदर्भ बॅक स्टेज असोसिएशनचे अध्यक्ष संदीप बारस्कर, पम्मीजी भत्ती, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विजय गजभिये, अमोल मौंदेकर, निखील कामडे, रविकांत पवनीपगार, विनायक मानकर, नितीन अन्नपूर्णे,दलजीत शाह, अभिजीत वालके, रोशन बिरहा, वैभव शेंडे, दिपक नितनवरे, रोशन गिरी, प्रविण बोकडे, नितेश मानकर, मदन पाटील, दिनेश वानखेडे, राकेश राउत, रामू नायडू, राकेश कनोजिया, पवन बोरकुटे, सादीक अन्सारी, नसीम भाई, राजेश रंगारी, कमलेश पांडे, अक्षय जुनघरे, राज जैस्वाल, निखील चुटे, कुणाल भोयर, काफील अंसारी, सलीम अंसारी, लाॅरेन्स, राहूल राउत, बादल ठोसरसह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.