तिरोडा व अर्जुनी मोर तालुक्यात अतिवृष्टी

0
10

गोंदिया,दि.29– जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून दडी मारलेल्या पावसाचे जिल्हयात आगमन झाल्यामुळे थोडया प्रमाणात का होईना शेतकèयांना दिलासा मिळाला आहे.किमान जिल्हयातील पिण्याच्या पाण्याचे संकट दुर होण्याची चिन्हे आहेत.त्यातच काल पडलेल्या पावसामुळे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोडंगावदेवी ,महागाव सर्कलमध्ये अतिवृष्टी झाल्याने ४५ घरे व ८ गोठ्यांचे नुकसान झाले आहे.
हे नुकसान ४ लाख २७ हजाराच्या सुमारे असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.जिल्ह्यात आज ५४.४६ टक्के पावसाची नोंद झाली असूनआजपर्यंत ४३५.५ मि.मी पावसाची नोंद करण्यात आली आहे.तिरोडा व अर्जुनी मोरगाव तालुक्यात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.गोंदिया तालुका ३९, गोरेगाव ५७, तिरोडा-१२४.४, अर्जुनी मोरगाव-१२६.४, देवरी१६, आमगांव-१४.६, सालेकसा-७.२८ तर सडक अर्जुनी येथे ५१.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.