नगरपरिषद आमगाव प्रभाग,आरक्षण व सोडत ६ सप्टेबरला

0
17

गोंदिया,दि.४ : जिल्ह्यातील नवनिर्मित नगरपरिषद आमगावचे प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १ सप्टेबर रोजी प्रारुप प्रभाग रचनेच्या प्रस्तावास मान्यता देवून ४ सप्टेबर रोजी नगरपरिषद सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडतीकरीता नोटीस प्रसिध्द करण्यात येईल. ६ सप्टेबरला नगरपरिषद सदस्य पदांच्या आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. ८ सप्टेबरला प्रारुप प्रभाग रचना, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना कलम १० नुसार रहिवाशांच्या माहितीसाठी व हरकती तसेच सूचना मागविणेकरीता वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. ८ ते १६ सप्टेबर पर्यंत हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी आहे. २० सप्टेबरला जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त हरकती व सूचनांवर सुनावणी देण्यात येईल. २२ सप्टेबर रोजी हरकती व सूचनांच्या अनुषंगाने अभिप्राय देवून विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, नागपूर विभाग यांचेकडे अहवाल पाठविण्यात येईल. २५ सप्टेबरला विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत अंतिम प्रभाग रचनेस मान्यता देण्यात येईल व अधिनियमातील कलम १० नुसार अंतिम अधिसूचना वृत्तपत्रात व स्थानिक पातळीवर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व नगर परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करण्यात येईल.
राज्य निवडणूक आयोगाने आमगाव नगरपरिषदेची प्रभाग रचना, आरक्षण व सोडतीचा कार्यक्रम घोषित केला असून नगरपरिषद सदस्य पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याची प्रक्रिया ६ सप्टेबर २०१७ रोजी दुपारी १२ वाजता नगरपरिषद सभागृह आमगाव येथे पार पाडण्यात येणार आहे. तरी नवनिर्मित आमगाव नगररिषद हद्दीत समाविष्ठ असलेल्या आमगाव, बनगाव, रिसामा, कुंभारटोली, पदमपूर, किंडगीपार, बिरसी व माल्ही या गावातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.