अनु.जनजाती आयोगाच्या सदस्या मायाताई ईवनाते यांना भेटले आदिवासी गोवारी जमातीचे शिष्टमंडळ

0
34
गोंदिया,दि.07-भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्याच्या दौर्यावर आलेल्या राष्ट्रीय  अनुसूचित जनजाती आयोगाच्या सदस्या मायाताई ईवनाते यांची आदिवासी गोवारी  मिशन देवरी संलग्न  आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवाना तालुका शाखा तुमसरच्या वतीने माजी उपसभापती दामोदर नेवारे, पं स  सदस्य गुरूदेव भोंडे ,प्रकाश लसुंते याच्या नेतृत्वाखाली  शिष्टमंडळाने भेटून निवेदन दिले.
निवेदनात 24 एप्रिल 1985 च्या राज्य शासनाच्या *जी. आर*. मधिल तसेच *सुधिर जोशी* कमेटि आणि *व.सु.पाटील* यांच्या अहवालातील गोवारी जमाती बाबतची कपोलकल्पीत व चुकीची माहिती वगळून महाराष्ट्रात राज्यात प्रत्यक्षात *गोंड गोवारी* जात अस्तित्वात नसल्यामुळे अनुसूचित जमातीच्या यादीतील *गोंड गोवारी*नोंदी ऐवजी  *गोवारी*अशी दुरूस्ती करण्यासाठी  TAC व राज्य शासना मार्फत *केंद्र सरकारला* शिफारस करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे अशा उल्लेख करण्यात आला आहे.गोंड, हलबी, परधान ,कवर इत्यादी आदिवासी समुदाया प्रमाणेच गरिब आदिवासी गोवारी जमातीचे लोक हे सुद्धा सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत.मात्र अनु. जमातीच्या  संवैधानिक हक्क अधिकाराअभावी गरिब गोवारी जमातीच्या अनेक पिढ्या गारद झालेल्या आहेत.एवढेच नव्हे तर अनु.जमातीच्या संवैधानिक हक्क अधिकाराच्या आंदोलना दरम्यान दि.23 नोव्हेंबर 1994  ला दुर्दैवाने 114 गरिब आदिवासी गोवारींचा हत्याकांड घडले.
आदिवासींचे झुंजार नेते तत्कालीन आमदार नारायण सिंह ऊईके यांनी स्वतंत्र भारताच्या इतिहासात सर्व प्रथम गरिब आदिवासी गोवारी जमातीच्या हक्क अधिकारासाठी  आवाज उठविला होता .क्रांतीवीर नारायणसिंह ऊईके यांनी आदिवासी गोवारी जमातीला अनु.जमातीच्या सोयी सवलती मिळाल्या पाहिजे. म्हणून 1953 व 1955 साली जाहीर मागणी केलेली आहे.त्यामुळे नंतर काका कालेलकर आयोगाने 1950 च्या अनु.जाती – जमाती च्या सुधारित बिलात समाविष्ट करण्यासाठी 1956 ला गोवारी अशी शिफारस केली होती .दुर्दैवाने अनु.जमातीच्या यादीत गोंड गोवारी अशी संयुक्त नोंद आली.म्हणून 1985 पर्यंत गोवारी जमातीच्या लोकांना प्रशासनाने गोंड गोवारी नावाने  अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र निर्गमित केले. तद्नंतर 24 एप्रिल 1985 च्या शासन निर्णयाने मुळचे गरिब आदिवासी गोवारी अनु.जमातीच्या संवैधानिक सोयी  सुविधांपासुन वंचित झाले .ती *गोंडगोवारी* चुकीची नोंद  अनु.जमातीच्या यादीत आजही कायम असल्यामुळे  आदिवासी गोवारी संविधानिक हक्क अधिकारापासुन वंचित आहेत. तरी  24 एप्रिल 1985 च्या राज्य शासनाच्या जी आर मधिल गोवारी विरोधी कपोलकल्पीत व चुकीची माहिती वगळण्यात यावी. सुधिर जोशी कमेटिच्या अहवालातील गोवारी विरोधी व चुकीची माहिती फेटाळण्यात यावी. व.सु.पाटील अध्यक्ष अनु.जमाती जात पडताळणी समिती नागपूर याचाही गोवारी विरोधी व चुकीची माहिती फेटाळण्यात यावी.अनु.जमातीच्या यादीतील *गोंड गोवारी* या संयुक्त नोंदी ऐवजी  *गोवारी* अशी दुरुस्ती करून  गोवारी जमातीला अनु.जमातीच्या सोयी सवलती मिळवून देण्यासाठी TAC व राज्य शासना मार्फत  *केंद्र सरकारला* शिफारस  करण्यासाठी प्रयत्न करावे. अशा प्रमुख चार मागण्यांचे निवेदन देण्यात आले. शिष्टमंडळामध्ये दामोदर नेवारे, गुरूदेव भोंडे तुमसर , मिशनचे सचिव रामेश्वर वाघाडे देवरी, प्रकाश लसुंते गर्रा बघेडा , उमराव कोहळे आलेसुर ,ईश्वरदास वाघाडे तुमसर , संजय ठाकरे देवरी , खुशाल राऊत आलेसुर , शामराव राऊत मंगरली, छबीलाल राऊत देवनारा ,माधोराव सेंदरे चिचोली, शेषराव राऊत आलेसुर , अशोक राऊत गोवारीटोला ;मोतीराम राऊत आलेसुर ; देवराव भोंडे रोंघा , दिपक वाघाडे आलेसुर , बालचंद सोनवणे आलेसुर ,नरेश मानकर चिचोली, बालचंद गाते गर्रा बघेडा,सेवकराम राऊत आलेसुर,विनोद सोनवणे गर्रा बघेडा,राजकुमार सोनवणे रोंघा,प्रकाश कोहळे आलेसुर,गिरधारीलाल भोयर सिवनी  इत्यादी बांधव उपस्थित होते.