भारनियमन बंद करा-शिवसेनेचे निवेदन

0
14

तुमसर,दि.14- जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात होत असलेल्या भारनियमनामुळे जनतेमध्ये भयंकर रोष पसरला असून भारनियमन तात्काळबंद करण्यात यावे, याबाबतचे निवेदन तुमसर तहसीलदार यांना देण्यात आले असून जिल्हाधिकार्‍यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे. विद्युत कपातीबाबत महावितरणचे उपकार्यकारी अभियंता रुपेश अवचट यांच्याशी शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले यांनी चर्चा केली.
रोज १0 ते १४ तास विद्युत कपात होत असल्यामुळे गावात अंधार पसरतो. याचा फायदा जंगली प्राणी घेत आहेत. जंगली प्राणी गावात येऊन शेळ्या, गायी म्हशी व अनेक पाळीव प्राण्यांचा फडशा पाडतात. यात मनुष्यहाणीसुद्धा झालेली आहे. नगरपरिषद तुमसर क्षेत्रातसुद्धा विद्युत राहत नसल्यामुळे गावकर्‍यांसह विद्यार्थीसुद्धा रात्रीला अभ्यासापासून वंचित राहत आहेत. विद्युत विभागाला तक्रार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये रोष असून भारनियमन बंद न केल्यास शिवसेनेतर्फे करो या मरो विराट जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
शिवसेनेचे वतीने तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देताना शिवसेना भंडारा जिल्हा प्रमुख इंजी. राजेंद्र पटले, पंचायत समिती उपसभापती शेखर कोतपल्लीवार, उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, तालुका प्रमुख नरेश उचिबघले, शहर प्रमुख नितीन सेलोकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमित एच. मेर्शाम, युवासेना उपजिल्हाप्रमुख मनोज चौबे, कामगार सेनचे तालुका प्रमुख मनोहर जांगळे, उपतालुका प्रमुख प्रकाश लसुंते, शैलेश मिर्शा, जगदीश त्रिभूवनकर, कृपाशंकर डहरवाल, योगेश सोनकुसरे, मोरेश्‍वर लांजेवार, सुखराम बडवाईक, प्रकाश चौधरी यांच्यासह मोठय़ा संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.