राज्यात तातडीचे भारनियमन ग्राहकांनी सहकार्य करावे-महावितरण

0
21

गोंदिया,दि.०५-वीज निर्मिती केंद्रांना कोळशाच्या उपलब्धतेत व पुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे तसेच सध्या राज्यात विजेची मागणी वाढल्याने संपुर्णराज्यासह भंडारा-गोंदिया जिल्ह्यात नियमित भारनियमन करावे लागत आहे.आज गुरुवारला(दि.५) राज्यात विजेची मागणी १९०३९ मेगावॅट असून विजनिर्मिती १२४०९ मेगावॅट आहे. जेव्हा की महावितरणची मागणी ही १५६३७ मेगावॅट असून वीज पुरवठा १०९११ मेगावॅट एवढी होत असल्याने राज्यभर प्रेशन केंद्र कळवा यांच्या आदेशानुसार भारनियमनाची अमलबजावणी केली नाही तर,याचा परिणाम थेट विज निर्मितीसंचावर होते व संच निकामी होऊन संपुर्ण राज्यच काळोखात जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.उदभवलेल्या वीजपुरवठ्यातील कमतरता व आकस्मिक निर्माण झालेल्या समस्येमुळे होत असलेल्या भारनियमनाचा वीज ग्राहकांना होत असलेल्या त्रासाबद्दल महावितरणतर्फे दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.वीज ग्राहकांनी राग न बाळगता या परिस्थितीत महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता जिजोबा पारधी यांनी जनतेला व ग्राहकांना आवाहन केले आहे.