बोरगाव ग्रामपंचायतीची निवडणुक निर्विरोध,भाजपचे वर्चस्व

0
11

तिरोडा,दि.05- येत्या १६ ऑक्टोबरला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत तिरोडा तालुक्यातील बोरगाव येथील नागरिकांनी एकत्र येत कुठलीही निवडणुक न करता निर्विरोध सरपंच व सदस्यांची निवड करण्याचा निर्णय घेतला.यामुळे बोरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदावर अनिल कृष्णा बोपचे यांची तर सदस्यामध्ये छ्नेश्कुमार माहुरकर, पुरणलाल टेंभेकर,सुखदेव शेंदरे, सुनंदा उमरकर, शारदा बोपचे,विना शेंदरे, माया भास्कर, यांची निवड करण्यात आली.ही निवडणुक निर्विरोध करण्यासाठी अनुप बोपचे यांनी पुढाकार घेत शासनाचा पैसा व वेळ वाचविला.आमदार विजय रहागंडाले यांनी विजयी सरपंच व सदस्यांचे आपल्या कार्यालयात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.यावेळी भाजप तालुकाधक्ष भाऊरावजी कठाणे,कृ.ऊ.बा.स.संचालक जितेंद्र रहांगडाले,तिरुपती राणे उपस्थित होते.