जिल्हा सत्र न्यायाधीश लद्दड यांना निरोप

0
20
गोंदिया,दि.06 : गोंदिया जिल्हा सत्र न्यायालयात २ वर्षापासून जिल्हा सत्र न्यायाधीशपदी कार्यरत असलेले अनिल लद्दड यांचे मुंबई येथे स्थानांतरण झाले. त्यानिमित्ताने २८ सप्टेंबर रोजी गोंदिया येथे जिल्हा सत्र न्यायाधीश एस.एन. कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला.
यावेळी गोंदिया जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. टी.बी. कटरे व सचिव अ‍ॅड. वसंता चुटे, आमगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. हिरालाल गुप्ता, देवरीचे अ‍ॅड. सचिन बावरिया, सडक अर्जुनीचे अ‍ॅड. राजेंद्र लंजे उपस्थित होते. सुरुवातीला न्यायाधीश लद्दड यांचा बार असोसिएशनचे अध्यक्ष व सचिव यांनी शाल, श्रीफळ देवून सत्कार केला. आपल्या अध्यक्षीय भाषणात जिल्हा न्यायाधीश कोठेकर यांनी लद्दड यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कामना करताना मार्गदर्शन केले. यावेळी अन्य मान्यवरांमध्ये मुख्य न्यायदंडाधीकारी पी.एच. खरवडे, तहसीलदार श्रीमती झरोदे, कु. मालोदे, श्री ढोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अ‍ॅड. ओमप्रकाश मेठी यांनी केले. तर आभार अ‍ॅड. आरती भगत यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने वकिल वर्ग व कर्मचारी उपस्थित होते.