भाजप व संघ कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा भाजयुमोतर्फे निषेध

0
12

गोंदिया,दि.09 : केरळ राज्यात सत्ताधारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांच्या हत्या व त्यांच्यावरील हल्ल्याविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया तर्फे निषेध व्यक्त करून राष्ट्रपतिंना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले यांच्या नेतृत्वात भाजयुमो कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि.९) उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे, केरळ राज्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जेव्हापासून सत्तेत आले आहे, तेव्हापासून आजवर भाजप व संघाच्या १२० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या हत्या झालेल्या आहेत. या आधीही कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप व संघाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या कु्ररतेने हत्या केलेल्या आहेत. यासाठी केरळ राज्यातील सत्ताधारी सरकार जबाबदार आहे. या घटनेचा भाजयुमो निषेध करीत असून, आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी व कार्यकर्त्यांच्या कुटुंबाना सुरक्षा पुरविण्यात यावी या मागणीचा समावेश निवेदनात आहे.निवेदन देताना, जिल्हा महामंत्री ऋषीकांत शाहू, पंकज सोनवाने, अरविंद तिवारी, नगरसेवक विवेक मिश्रा,सतीश मेश्राम, दिलीप पिल्ले, विद्यार्थी मोर्चा जिल्हाध्यक्ष समीर आरेकर, अभय मानकर, संदिप श्रीवास, प्रणय शर्मा, ऋतुराज मिश्रा, पलाश लालवानी, मुकेश हलमारे, तरूण मेठी, पारस पुरोहित, अमित भुजाडे, बबलू रहांगडाले, ऋषभ लिल्हारे, रोहीत, मनीषकुमार, भुपेंद्र पाचे, पप्पू बघेले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.