पार्किंगसाठी उड्डाणपुलाखालील जागेसह इतर जागेचा पर्याय

0
12

गोंदिया,दि.09 : शहरातील अरुंद रस्ते,त्यातच पार्किंगची नसलेली व्यवस्था आणि वाहकाकंडून होणारी बेशीस्त पार्किंग, पोलीस कर्मचार्यांचे निवासस्थान,रावणवाडी व रामनगर पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामाच्या विषयाला घेऊन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ यांच्यासोबत बैठक घेत सविस्तर चर्चा केली.शहरात पार्किंगची व्यवस्था नसल्याने शहरवासीयांना होत असलेली अडचण बघता आमदार अग्रवाल यांनी पार्किंगबाबत त्वरीत नियोजन करणे गरजेचे असल्याचा मुद्दा चर्चेच्यावेळी मांडला. यावर नगरसेवक शकील मंसूरी यांनी अग्रसेन गेट ते गोंदिया गॅस एजंसी, सुभाष शाळेचे मैदान, शहर पोलीस ठाण्यामागील पार्किंगसाठीची आरक्षित जागा, बाजारातील दिल्ली होटल ते दुर्गा चौक पर्यंतच्या गल्लीची सफाई करून पार्कींगची व्यवस्था केली जाऊ शकते असे निदर्शनाास आणून दिले.शहरातील अरुंद रस्त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत असल्यामुळे पोलीस अधीक्षक भुजबळ यांनी अतिक्रमण तोडून शहरातील रस्ते रूंद करण्या बाबत नगर परिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांना लगेच माहिती देण्याबाबत सुचना दिल्या.तर आमदार अग्रवाल यांनी उड्डाणपुलाखालील जागा पार्किंगसाठी पर्यायी व्यवस्था होऊ शकत असल्याने नगरपरिषदेने त्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सुचना दिल्या.

रावणवाडी येथे ठाण्यासाठी वन विभागाची जागा असून वन विभागाकडून कारवाई होत नसल्याने इमारतीचा प्रश्न रखडला गेला तर रामनगर शाळेसमोरील मैदान रामनगर पोलीस ठाण्यासाठी हस्तांतरणासाठी नगर परिषदेकडून प्रयत्न होत नसल्याचे पोलीस अधिक्षकांनी आ.अग्रवालांना सांगीतले.त्यावर आमदार अग्रवाल यांनी उपवनसरंक्षख युवराज यांच्याशी फोनवर चर्चा करून रावणवाडी येथील जागा पोलीस विभागाला आठवड्याच्या आत देण्याचे निर्देश दिले. रामनगर पोलीस ठाण्यासाठीही आठवड्यात जागा उपलब्ध करवून देण्याचे आश्वासन मुख्याधिकारी पाटील यांनी दिले. शिवाय मनोहर चौक स्थित पोलीस लाईनच्या जागेवर १५० पोलीस क्वाटर्स तयार करण्यावर चर्चा या बैठकीत झाली.बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण,बैठकीला उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा नगर रचनाकार दीपक वºहाडे, पोलीस उप अधीक्षक (गृह) दिपाली खन्ना, उप अधीक्षक भूमी अभिलेख सतीश पवार, पोलीस निरीक्षक मनोहर दाभाडे, रामनगरचे निरीक्षक संजय देशमुख, रावणवाडीचे सचीन सांडभोर, कॉंग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष अशोक चौधरी, अ‍ॅड. योगेश अग्रवाल, जहीर अहमद यांच्यासह अन्य अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.