वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचे आंदोलन

0
9

नागपूर,दि.12:- नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या मागण्या पूर्ण होत नसल्याने मागील पाच दिवसापासून हे डॉक्टर संपावर आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मधील ४०० डॉक्टरांना निष्कासित करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व डॉक्टर एकत्र येऊन जेआर तुला जीएमसी वर भरोसा नाही का? म्हणत आंदोल केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील घटणाऱ्या घटनांचे नाट्यरूपांतर करून मेडिकल परिसरातच नागरिकांसमोर ते सादर करण्यात आले. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असणाऱ्या समस्या, आणि शासनाचे त्याकडे होणारे दुर्लक्ष याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले.