दिवाळीत शौचालय तयार करा-सीईओ ठाकरे

0
2

तिरोडा,दि.13 : तालुक्यातील बेरडीपार(काचेवानी) येथे जिल्हा हांगणदारीमुक्त करण्यासाठी सुरु असलेल्या धडपडीअंतर्गत  गुरूवारी (दि.१२) पहाटे ५ वाजता जि.प.सीईओ आर.एच.ठाकरे यांच्या नेतृत्वात गुडमॉर्निंग पथक अभियान राबविण्यात आले. अपघात झाल्यास, आजारी पडल्यास पैसा नाही म्हणून उपचार थांबविले जात नाही. प्राधान्यक्रम ठरवून आपण पैसा खर्च करतो. शौचालय केवळ एका व्यक्तीच्या सोयीनेच नव्हे तर संबंध गावाच्या आरोग्यासाठी गरजेचे आहे. त्यामुळे या दिवाळीत घरात शौचालय तयार करा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आर.एच. ठाकरे यांनी केले.
या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक एस.डी. मुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश बागडे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजेश वासनिक, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नरेश भांडारकर, तिरोडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जावेदखान इनामदार, अर्जुनी-मोरगावचे गटविकास अधिकारी एन.आर. जमईवार, देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज हिरुडकर, सालेकसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी ए.एल. खाडे, आमगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.एन. पांडे, गोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन पानघरे, सरपंच ज्योत्स्ना टेंभेकर, गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे, गोंदिया पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन पानघरे, उपसरपंच ज्ञानेश्वर कटरे, ग्रामपंचायत सदस्य जयकुमार रिनाईत उपस्थित होते.