सोमवारला जिल्ह्यात ग्रांपनिवडणुका भाजपच्या आमदारांची कसोटी

0
11

गोंदिया- जिल्ह्यात १६ आक्टोंबरला ३४७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या असून भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत आपल्या पक्षाचा सरपंच निवडून यावा यासाठी चांगलीच कंबर कसली आहे.भाजपचे मंत्री राजकुमार बडोले,आमदार परिणय फुके,विजय रहागंडाले,संजय पुराम,जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी तालुक्यातील मोठ्या गावांना आपल्या ताब्यात घेण्यासाठी आर्थिक रसद पुरविण्यापासून सर्वच सुविधा आम्ही पुरवू फक्त सरपंच आमच्या हाती द्या हा नारा लावला आहे.त्यातच काँग्रेसकडून एकटे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी निवडणुकीची धुरा सांभाळत त्यांनीही गावोगावी सभा घेतल्या.या दोन्ही पक्षानी चांगलीच कंबर कसल्याने भाजप काँग्रेस अशीच चुरस राहणार आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठेही असा गवगवा qकवा उल्लेख दिसून येत नाही.तर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मुकेश शिवहरे यांनीही पक्षासाठी निवडणुकीत लक्ष घातले आहे.जिल्ह्यातील ३४७ ग्रामपंचायतीमध्ये सार्वित्रक निवडणूक होत आहे. या निवडणूकीत मतदान यंत्राद्वारे मतदान होणार असल्यामुळे ११८९ कंटड्ढोल युनिट व २६०९ बॅलेट युनिट उपलब्ध झाली आहे. या निवडणूकीत १०८१ मतदार केंद्र राहणार आहेत. या मतदान केंद्रात २ लाख ५१ हजार ३१४ स्त्री आणि २ लाख ५१ हजार ८८६ पुरु ष असे एकूण ५ लाख ३ हजार २०० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून देवरी,सालेकसा,व अर्जुनी मोरगाव तालुक्यात मतदानाची वेळ ३ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे.