लायंस क्लब तुमसरतर्फे अन्नदान वितरण कार्यक्रम

0
15

तुमसर,दि.15 -लॉयन्स क्लब तुमसरच्यावतीने विश्वसेवा सप्ताह अंतर्गत स्थानीय आंबेडकर, गौतम व कुंभारे वार्डात जिवनावश्यक खाद्य सामानाचे गोरगरिबांना वितरण करण्यात आले.यात तांदूळ, पीठ, तुवर दाल, मीठ, तेल, मिरची, हळद, मसाला पावडर व लोणचे आलू कांदे सह वस्तुचा समावेश करुन १०१ पिशव्या तयार करुन गरजु लोकांना वितरीत करण्यात आले. या प्रसंगी विशेष अतिथीला कुमकुम वर्मा, डीस्ट्री्क्चेअरपर्सन (अन्नदान कार्यक्रम) व तसेच कार्यक्रमाचे प्रकल्प अधिकारी लॉ. शंकरदादा बडवाईक डीस्ट्री्नट चेअरपर्सन व नरेंद्र ठाकुर व लॉ. राजकुमार खंडेलवाल (पी.आर.ओ) हे होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुमसरचे अध्यक्ष इंजि लॉ. राजेश पारधी हे होते. सेवा सप्ताह अधिकारी व उपाध्यक्ष (प्रथम) इंजि एम. जे. एङ्क. लॉ. प्रदिप मोतीरामजी पडोळे व नगरसेवक लॉ. किशोर भवसागर यांनी दिले. तसेच लॉयन्स ्नलबचे पदाधिकारी यांनी सुध्दा आर्थिक सहभागातून अन्नदानासाठी मदत केली.