भंडारा आर्थीक गुन्हे शाखेचे उद्घाटन

0
12

भंडारा,दि.15-भंडारा जिल्ह्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन  १० आॅक्टोंबर रोजी पोलिस अधिक्षक विनीता साहु पोलिस यांच्या हस्ते करण्यात आले असुन सदर शाखेत फसवणुक, ठकबाजी सारख्या मोठ्या आर्थिक गुन्ह्यांच्या तपास होणार आहे. पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याकरिता शाखेची निर्मिती केली आहे. या शाखेचे कार्यालय पोलिस मुख्यालयात असून उपविभागीय अधिकारी दर्जाचा अधिकारी प्रमुख राहणार आहे.