‘त्या’ नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू

0
6

नागपूर,दि.14 : विदर्भात धुमाकुळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीचा अखेर मृत्यू झाला आहे. बोर अभयारण्याच्या हद्दीत वीजेच्या धक्क्यानं वाघिणीचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या नरभक्षक वाघिणीला जीवे मारण्याचे आदेश हायकोर्टाने दिले होते.

तब्बल चार महिन्यांचा प्रवास करुन घरी परतलेल्या टी-27 वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्कामोर्तब केले होते. मात्र वन्यजीव प्रेमी या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेण्याची तयारी चालवली होती.वर्धा, चंद्रपूर, अमरावती नंतर काटोल येथे दहशत पसरवणाऱ्या त्या नरभक्षक वाघिणीचा मृत्यू झाला. वर्धा जिल्ह्यातील  सिंदीविहीरी येथिल भगवान टेकाम यांच्या शेतात लावलेल्या जिंवत विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने या वाघिणीचा मृत्यु झाला. मागील महिण्याभरापासून सुरू असलेली या वाघिणीची दहशत क्षनात संपली. गेल्या महिन्या भऱ्यात वन विभागाचे प्रयत्न असफल होत असतांना सिंदीविहरी येथील भगवान टेकाम यांच्या ज्वारीच्या शेतात विद्युत प्रवाह लावला असता त्याला वाघिणीचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला.