मानेगाव/ स येथे ग्रामविकास पॅनल दणदणीत विजय

0
10

लाखनी,दि.21- ग्रामपंचायत हा सामान्य जनतेच्या समस्या सोडविण्याचे लोककार्यालय असे मानले जाते. गावाचा विकास आणि नागरिकांच्या सर्व सोयी सुविधा पुरविण्याचे कार्य ग्रामपंचायती द्वारे केले जाते. नुकताच जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागले. लाखनी तालुक्यात सर्वात जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणूक होत्या. मतमोजणी केंद्रांवर सकाळपासूनच उमेदवार, कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती. लाखनी तालुक्यातील मानेगाव/ स  येथे भाजपा समर्थीत ग्रामविकास पॅनलने दणदणीत विजय प्राप्त केला. यामध्ये थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत नरेंद्र भांडारकर प्रचंड बहुमताने विजयी झाले. एका सामान्य गरीब कार्यकर्त्याला सरपंच पदावर बहुमताने कौल देत थेट जनतेतून सरपंच निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास बसला आहे. ग्रामविकास पॅनलचे नरेंद्र दसाराम भांडारकर सरपंच, प्रविण रमेश बोरकर, ललिता मनिराम पाखमोडे, सरिता मधुकर खराबे, लुकिराम सुदाम डोरले, प्रभावती रामचंद्र गंथाडे, पंकज शामराव चेटूले, शेबे अनिता कृष्णा चेटूले असे बहुमताने कौल मिळाला.

या संपूर्ण निवडणूक विजयाचे श्रेय प्रा.अशोक चेटूल अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गीरिष निखाडे, भाजपा जिल्हा संयोजक प्रशांत गायधनी, लक्ष्मण पाखमोडे, यशवंतराव चानोरे,  सचिन चेटूले, भाजपा तालुका महामंत्री संदिप भांडारकर, सुकलाल समरित,  तालुका महामंत्री उमेश गायधनी, चुडामनी कंकलवार, थामेश चानोरे, विलास आग्रे, आनंद नस्कोलवार, आकाश निखाडे, भुपेश ढेंगे,  हरिहर भांडारकर, अंकित कांबळे, कार्तिक चेटूले, दिगांबर सेलोकर, संजू शेबे, क्रिषना चेटूले, प्रेमलाल पाखमोडे, प्रशांत पाखमोडे, महेश बारसागडे, सुरेंद्र आग्रे, दानेंद्र निखाडे, रामचंद्र बांगळकर, धम्मदीप वंजारी, सोनूलाल माकडे, नितेश रोटके, सौ.कांताबाई डोरले, धम्मदीप  वजारी, रक्षित कांबळे, मयुर चेटूले, बबलू बोरकर, मूकेश भांडारकर यांना दिले गेले आहे.