‘भूमीअभिलेख‘च्या कर्मचार्यांनी लावल्या काळ्या फिती  

0
13
कर्मचार्याला मारहाण प्रकरणाचा निषेध : जिल्हा अधीक्षकांना निवेदन
गोंदिया,दि. २६ : येथील भूमीअभिलेख कार्यालयाचे कर्मचारी आर. एन. कामत यांना मारहाण केल्याप्रकरणाचा निषेध करीत कर्मचार्यांनी आज, गुरुवारी काळ्या फिती लावल्या. पुढील तीन दिवस काळ्या फिती लावून काम करणार असल्याचे कर्मचार्यांनी सांगितले. विदर्भ भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या बॅनरखाली कर्मचार्यांनी हे पाऊल उचलले आहे.
उपअधीक्षक भूमीअभिलेख भूकरमाफक कार्यालयाचे कर्मचारी आर. एन. कामत हे मंगळवारी (ता.२४) इर्री येथे जमीन मोजणीकरिता गेले होते. दुपारी एक वाजताच्या सुमारास ताराचंद नागपुरे व त्याच्या पत्नीने कामत यांना शिवीगाळ केली. शिवाय कुèहाडीने मारहाण केली. दरम्यान, गोंदिया ग्रामीण पोलिसांनी आरोपींना अटक करावी, अशी मागणी करीत कर्मचाèयांनी काळ्या फिती लावून काम केले. याबाबतचे निवेदन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांना दिले.