पालकमंत्री बडोले यांनी केले कटंगी सरपंच व सदस्यांचे सत्कार

0
11
गोंदिया, दि.26ः- सहकार परिषदेच्या निमित्ताने कटंगी (कला) येथे २६ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री राजकुमार बडोले आले असता त्यांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी त्यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
यात कटंगी (कला) ग्रापं निवडणुकीत निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच प्रतिभा डोंगरवार, सदस्य सुरेश डोंगरवार, विनोद बिसेन, रविता उपरीकर, विमला उईके, रेवन चव्हाण, संजय बडवाईक, रिना मेश्राम, माया डोमळे यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार करून भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, माजी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल, भिकाजी चव्हाण, जिल्हा संपर्क प्रमुख संजय कुलकर्णी, भाजपा जिल्हा सचिव प्रदिपqसह ठाकूर, जयंत शुक्ला, पुरुषोत्तम राऊत, अखिलेqसग ठाकूर, राजेश डोंगरवार, धम्मा मेश्राम, देवेंद्र राणे, राजेश बावनकर, बबलू डोनेकार, मैनू वराडे, देवेंद्र राऊत, दीपक डोंगरवार, भुरू ठाकूर, निरज ठाकूर, प्रभाकर चव्हाण, हेमराज नागरिकर आदी गावकरी उपस्थित होते.