नगराध्यक्षांच्या निर्णयामुळे कर्मचार्‍यांची दिवाळी आनंदात

0
12

गोंदिया,दि.04ः- कंत्राटी कर्मचारी, सेवानवृत्त कर्मचारी, नियमित कर्मचारी यांचे वेतन तसेच कंत्राटदारांची बिले, वर्तमानपत्रांच्या जाहिराती, दिवाळी अग्रीम राशी देण्याकरिता दिवाळीपूर्वी कर्मचार्‍यांच्या हिताचा निर्णय नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी घेतला. नगर पालिकेच्या इतर फंडात असलेली साडेचार कोटी रुपयांची रक्कम या कामी वापरण्यात आली. याकरिता शासनाची रितसर परवानगी घेण्यात आली. हा निधी नगर पालिकेचा असून निधी शासनाकडून मिळाल्यानंतर ते साडेचार कोटी जमा करण्यात येतील. अध्यक्ष अशोक इंगळे यांच्या या निर्णयामुळे कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी, सेवानवृत्त कर्मचारी यांची दिवाळी उजेडात गेली. त्यामुळे कर्मचार्‍यांनी नगर अध्यक्ष अशोक इंगळे यांचे आभार मानले.
नगर पालिका स्थानिक स्वराज्य संस्था आहे. पैशाचे व्यवहार करताना शासनाने या संस्थेला काही अधिकार बहाल केले आहेत. एखाद्यावेळी एका विशिष्ट फंडात रक्कम आहे. तिचा साध्य उपयोग नाही. परंतु ज्या कामावर खर्च करायवयाचा आहे, त्या फंडात पैसे नाही, अशावेळी नगर परिषद शासनाची मान्यता घेवून ती रक्कम वळती करू शकेत. दिवाळी सण जवळ आला असता कर्मचार्‍यांचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे वेतन झाले नव्हते. तसेच रोजंदारीवरील सफाई कर्मचारी यांना दिवाळी अग्रीम, रोजंदारीवरील सेवानवृत्त कर्मचार्यांना रिट्रायमेंट राशी, रोजदारी कर्मचार्‍यांची जानेवारी ते जून २0१७ या कालावधीतील ईपीएफ राशी देणे क्रमप्राप्त होते. तसेच वर्तमानपत्र आणि कंत्राटदार आणि इंधनखर्च हे देखील दिवाळीच्या सणनिमित्त देणे आवश्यक होते. त्यामुळे सर्व बाबींचा विचार करून गोंदिया नगर पालिकेशी संबंधित सर्वांची दिवाळी सुखमय जावी, हा विचार करून नगर पालिकेकडे इतर बाबीकरिता उपलब्ध निधी आवश्यक कामाकरिता वळते करण्याची परवानगी शासनाकडे मागितली या बाबीवर शासनाने सकारात्मक भूमिका घेत परवानगी दिली.
नगर पालिकेने शासनाला या बाबीचे स्वागत करून साडेचार कोटी रुपये स्थायी कर्मचार्‍यांचे दोन महिन्याचे वेतन, सेवानवृत्त कर्मचार्‍यांची रिट्रायरमेंट राशी, कंत्राटी कर्मचार्‍यांना दिवाळी अग्रीम, वर्तमानपत्रांचे बिल, कंत्राटदारा आणि इंधनखर्च यांचे भुगतान केले. पालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच शासनाकडे पाठपुरावा करून असा धाडसी निर्णय घेतल्यामुळे पालिकेशी संबंधित सर्वांची दिवाळी उजेडात गेल्याने नगर परिषद कर्मचार्‍यांनी अध्यक्ष अशोक इंगळे यांचे अभिनंदन केले.