तुडतुडा व अन्य किडीमुळे उभे धानपीक पेटवले

0
28

तुमसर,दि.04 :तालुक्यातील धान पिकावर तुडतुडा व अन्य संक्रमक किडीने आक्रमण केले असून धान नष्ट झाले. त्यामुळे सिहोरा चुल्हाड परिसरातील त्रस्त शेतकर्यांनी उभ्या पिकांना आगी लावल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारला दुपारी १ ते ३ वाजेच्या दरम्यान घडला.
तुमसर तालुका धान उत्पादक तालुका म्हणून प्रसिध्द आहे. यावर्षी अस्मानी संकट उभे राहील. दुबार पेरणी शेतकºयांनी केली. त्यानंतर पावसाने दगा दिला. त्यातून शेतकरी कसाबसा सावरला. त्यानंतर धान पिकावर तुडतुडा व अन्य संक्रमक किडीने आक्रमण केले. धानाच्या लोंबी भरल्या नाही. पीक खाली वाकले. उभे धान पीक काळसर व पिवळसर जळाल्यासारखे झाले. शेतातील धानपिक कापणीसाठी शेतकºयांजवळ पैसे नाही. मजुरी कुठून देणार असा प्रश्न त्यांना पडला. धान कापणीनंतर जनावरेही तो चारा खात नाही. या धानाला उग्र वास सुटला आहे. त्यामुळे शेतकºयांनी उभे धानपिक जाळण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी दुपारी १ ते ३ दरम्यान टेमनी, चुल्हाड, गोंदेखारी परिसरातील १५ ते २० गावातील शेतकºयांनी सुमारे ५० हेक्टर क्षेत्रातील धानपिकाना आगी लावल्या. यात किसन ठाकरे, हिरालाल ठाकरे, जियालाल ठाकरे, जिवतु ठाकरे, फकरीचंद बिसने, छोटु ठाकरे, सुरजलाल तितीरमारे, बाबुलाल पारधी, भाऊलाल पारध्ीा, ज्ञानेश्वर ठवकर, डॉ.रमेश पारधी, कंठीलाल ठाकरे, खुमनलाल चौधरी, दुलीचंद तुरकर या शेतकºयांचा त्यात समावेश आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी उईके, तलाठी यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.