सोमनपल्ली ग्रा.पं. च्या पदाधिकाऱ्यांनी घेतली माजी आमदार आणि जि.प.उपाध्यक्षांची भेट

0
14

आलापल्ली,दि.07 : सिरोंचा तालुक्यातील नक्षलग्रस्त आणि अतिदुर्गम भागातील सोमनपल्ली या ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंच व ग्राम पंचायत सदस्य व आविस पदाधिकाऱ्यांनी आविस नेते व अहेरीचे माजी आमदार दीपक दादा आत्राम व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अजयभाऊ कांकडलवार यांची भेट घेतले.मागील महिन्यात तालुक्यातील सात ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडले होते .यात सोमनपल्ली ग्राम पंचायतीच्या सुद्धा समावेश असून या ग्राम पंचायतीवर आविस चे सरपंच आणि चार ग्राम पंचायत सदस्य निवडून आले आहे .
सोमनपल्ली ग्रामपंचायतीवर पहिल्यांदा आविसने झेंडा फडकविले आहे .नवनिर्वाचित सरपंच आणि ग्राम पंचायत सदस्यांची माजी आमदार व जि. प. उपाध्यक्षांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले .यावेळी माजी आमदार व जि. प. उपाध्यक्षांनी सोमनपल्ली ग्राम पंचायतीला योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.आविस नेत्यांच्या भेट घेणाऱ्यांमध्ये सोमनपल्ली येथील सरपंच सरोजनी बसवय्या तलांडी , ग्रामपंचायत सदस्य रमेश गावडे, रवींद्र गावडे, राधा सडमेक , चंद्रक्का वेलादी सह बसवय्या तलांडी, चंद्रय्या सडमेक, आबय्या पल्लेम, भिमराव फुलसे, निम्मय्या मोडेम,नरेश सडमेक, कनकय्या गावडे आदी आविस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या समावेश आहे .