थकबाकीदार शेतक-यांना वीज देयके संपूर्ण महितीसह

0
9

मुख्यमंत्री कृषी संजीवनीयोजना-२०१७

गोंदिया, दि.११- :राज्यातील कृषीपंपांची थकबाकी असणा़-या शेतक-यांसाठी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना -२०१७ लागू करण्यात आलेली आहे. या योजनेत लाभार्थी असलेल्या शेतकऱ्यांना महावितरणकडून १ नोव्हेंबरपासून संपूर्ण महितीयुक्त वीज देयके देण्यात येत असून त्यात थकबाकीची रक्कम किती व ती किती हफ्त्यात भरावयाची याची माहिती देण्यात आलेली आहे.

योजनेत लाभार्थी असलेल्या शेतक-यांच्या देयकात महावितरणच्या बोधचिन्हाशेजारी मुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजना- २०१७ असे ठळक अक्षरात नमूद केले आहे. या देयकात खालील बाजूस ग्राहक क्रमांक,ग्राहकाचे नाव, चक्री क्रमांक नमूद केलेला आहे. देयकाच्या डाव्या बाजूस १५ नोव्हेंबर २०१७ पूर्वी शेतकऱ्यांनी किती रक्कम भरायची आहे याची माहिती दिली आहे. तसेच डिसेंबर २०१७ ते डिसेंबर २०१८ पर्यंत ५ हफ्त्यात किती रक्कम भरावी लागणार आहे याची सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. या शिवाय चौकटीत जून-२०१७ चे देयक या अगोदर वितरित करण्यात आले असून हे देयक मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ अंतर्गत सहभागी होण्यासाठी तसेच थकीत रकमेचे सुलभ हफ्ते माहित होण्यासाठी देण्यात येत आहे, असे नमुद केले आहे.

या देयकात महावितरणकडून ३०,०००/- रुपयाच्या आत थकबाकी असणा-या ग्राहकांना ५ सुलभ हफ्ते तर ३०,०००/- पेक्षा जास्त असणा-या शेतक-यांना १० सुलभ हफ्ते मिळणार आहेत याची सविस्तर माहिती ही देयकात देण्यात आलेली आहे. तसेच, मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेची ठळक वैशिष्ट्य काय आहेत याची माहिती देण्यात आलेली आहे. तसेच थकबाकीचें हफ्ते नियमित भरणा-या शेतक-याना नेमका किती रुपयाचा दंड आणि व्याज माफ करण्याबाबत शासनाकडून विचार करण्यात येईल याचाही आकडा नमूद करण्यात आलेला आहे. थकबाकीदार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषी संजिवनी योजनेत सहभागी होवून थकबाकीमुक्त व्हावे व महावितरणला सहकार्य करावे असेआवाहन महावितरणने केले आहे