ओबीसी संघर्ष कृती समितीने पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन

0
9

गोंदिया,दि.11-गोंदिया जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समितीच्यावतीने शुक्रवारला गोंदिया जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याच्या मागणीसह पिकविम्याद्वारे शेतकèयांची झालेली फसवणूक थांबवून पिक विम्याचे नियम बदलविणे,ओबीसी विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू लागल्याने शिष्यवृत्तीसाठीची जुनीच प्रकिया राबविणे,नान क्रिमिलेयरच्या उत्पन्न वाढीचा शासन निर्णय काढण्यासह इतर मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे यांना  सादर करण्यात आले.

पिक विमा काढ्ण्यासाठी सरकार व जिल्हाप्रशासना ज्याप्रमाणे गावागावात जाऊन शेतकय्ाना पीक विमा काढण्यासाठी प्रोत्साहित करीत होते तेच जिल्हाप्रशासन आता यावर्षी पिक न झाल्याने व दुष्काळी परिस्थिती असल्याने पिक विमा कंपनीकडून  पिक विम्याची नुकसान भरपाई मिळवून देणार काय अशा प्रश्नही या निवेदनाच्या माध्यमातून करीत शेतकर्यांची फसवणूक करण्याचे काम जिल्हाप्रशासनाने केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्यासोबतच ओबीसी विद्यार्थ्यांचे प्रश्न त्वरीत सोडविण्यात यावे,अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल असा इशारा दिला आहे.निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष बबलू कटरे,कार्याध्यक्ष अमर वराडे,उपाध्यक्ष कैलास भेलावे,राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सहसचिव खेमेंद्र कटरे,संघर्ष कृती समितीचे महासचिव शिशिर कटरे,प्रसिध्दी प्रमुख सावन डोये,राजेश कापसे,सुनिल भोंगाडे,ओबीसी सेवा संघ गोरेगाव तालुकाध्यक्ष डाॅ.संजिव रहागंडाले,गुड्डू खोब्राग़डे,पंकज सोनवाने,सुनिल रहागंडाले,बंटी पंचबुध्दे,संतोष यादव,राहूल,जीतू,रवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.