उपजिल्हा रुग्णालयात तंबाखूविरोधी दिवस

0
29

तिरोडा,दि.१४ः- येथील चलतीबाई उपजिल्हा रुग्णालयात १३ नोव्हेंबरला तिरोडा तालुका न्याय विधी सेवा समितीच्यावतीने व्यसनमुक्त समाज व तंबाखूविरोधी दिवसानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रqवद्र ठाकरे यांनी व्यसनापासून व तंबाखूमूळे होणाèया रोगावर माहिती देतांना आजचा युवक हा पुर्णंत व्यसनाचा आहारी गेल्याचे पटवून देत या नवपिढीला यापासून दूर ठेवण्यासाठी व्यसनमुक्त समाज घडविणे गरजेचे असल्याचे विचार व्यक्त केले.सोबतच या व्यसनामुळे होणाèया रोगांबद्दलची माहितीही दिली.तालुका दिवाणी न्यायालयाचे न्यायाधिश श्री बचोले यांनीही व्यसनमुक्त समाज काळाची गरज असल्याचे विचार व्यक्त केले.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शाम निमगडे यांनी तंबाखूमूळे कॅसर रोग होत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील पुर्व विदर्भाचा भाग हा ४० टक्के या व्यसनाच्या आहारी गेल्याने कँसरच्या रुग्णामध्ये सातत्याने वाढ होत असल्याची माहिती देत शासन व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी राबवित असलेल्या योजनांची माहिती दिली.यावेळी सेवानिवृत्त वैद्यकिय अधिकारी डॉŸ।सतिश जायस्वाल,संपादक खेमेंद्र कटरे,डॉŸ.भुमेश पटले,डॉ.शेख,अ‍ॅड भांडारकर उपस्थित होते.संचालन व आभार अ‍ॅड भांडारकर यांनी मानले.