बांधकामासंदर्भातील निश्चित नियोजन जानेवारीपर्यंत सादर करा

0
9

गडचिरोली,दि.19- जिल्ह्याचा विकास हा रस्त्याच्या, पुलाच्या बांधकाम निर्मितीवर अवलंबून असल्यामुळे विभागानी कामे करतांना सामाजिक दायित्वाचे भान ठेवून पारदर्शकतेने कामे करावे तसेच आवश्यकत त्या बांधकामाचे निश्चित नियोजन करुन निधीची मागणी जानेवारी पर्यंत सादर करा असे निर्देश राज्याचे महसूल, मदत व पुनर्वसन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित केलेल्या चर्चासत्रात जिल्ह्यातील अभियंत्यासोबत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख आदींची आदी उपस्थित होते. या चर्चासत्रात जिल्ह्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कॉन्ट्रॅक्टर मोठया संख्येने उपस्थित होते. 

पुढे बोलतांना पाटील म्हणाले की, नक्षलवाद चळवळीमुळे बांधकाम ठेकेदार काम करण्यास इच्छूक नसतात. त्यामुळे त्यांना पोलिस विभागाच्या संरक्षणात काम करावे लागते. काम करीत असताना विपरीत घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात कामाचा वेग संथ झाला. याकरीता प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी व काँन्ट्रॅक्टर यानी समन्वय साधुन कामकेल्यास याही अडचणीवर मात करणे सुलभ होईल.जिल्ह्यात पोलिस विभागाने, श्रमदानाची मदत घेऊन व सामाजिक दायित्वभान भान ठेवून कामे करीत आहेत. ही बाब कौतूकास्पद असून  बांधकाम खात्यांनी उत्तम काम करणाºया  अधिकारी, कर्मचाºयांना यथोचित सत्कार करण्याचा मानस केलेला असून चुकीचे काम करणाºयांना शासन सुध्दा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी पोलिस अधिक्षक डॉ. देशमुख यांनी सादरीकरणाव्दारे जिल्ह्यात रस्ते व पुलांचे बांधकाम करणे किती महत्वाचे आहे याविषयी सचित्र दर्शनाव्दारे सांगुन जर पूल, रस्त्यांचे बांधकाम झाले नाही तर ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याचा लाभ आपण मिळवून देऊ शकणार नाही. तसेच शासकीय योजनाचा लाभसुध्दा लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे दुरापास्त होईल. तेव्हा त्यांनी बांधकामावर विशेष लक्ष देण्याची विनंती केली. सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधिक्षक अभियंता प्रदीप खेवले यांनी जिल्ह्यातील पुर्ण झालेल्या बांधकामाच्या तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामा संदर्भात माहिती अवगत करुन दिली. आणि प्रलंबित असलेले कामे लवकरच पुर्ण करीत असल्याची खात्री सुध्दा यावेळी दिली.