खड्यांच्या दुरुस्तीसाठी हवा तेवढा निधी देऊ-चंद्रकांत पाटील

0
14

गोंदिया,दि.२०-खड्डयांच्या आढाव्यासाठी आलेल्या मंत्र्यांनी खड्डे भरण्यासाठी निधीची कमतरता नसणार असल्याची ग्वाही देत,खड्डे पाडा आणि भरा म्हणजे बांधकामाचा विकास होईल असा काही जणू संदेशच त्यांनी आपल्या या दौèयानिमित्त आयोजित सवांद बैठकीतून संदेश दिल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यातील राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गावरील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांची दुरुस्ती १५ डिसेंबरपर्यंत करण्यात यावी. खड्डयांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी व वाहतूकदारांना त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले.सोबतच खड्डयांच्या दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.ते रविवारला गोंदिया जिल्ह्याच्या आपल्या पहिल्या व दोन तासाच्या दौèयावर आले असतांना जिल्हाधिकारी कायालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बांधकाम विभागातील अधिकाèयांशी सवांद साधण्यासाठी आले होते,ते सुध्दा खड्ड्यांच्या कामांचे त्यामुळे त्यांचा हा दौराच संशयास्पद ठरला आहे.
मंत्री खड्यांच्या हिशोब घ्यायला आले की,खड्यामध्ये खर्च होणाèया निधीचा हिशोब घ्यायला हीच चर्चा कंत्राटदारवर्गासह भाजपच्या लोकांमध्येही होती.कारण भाजपचे मंत्री असताना भाजपच्याच प्रमुख पदाधिकारी,लोकप्रतिनिधीनां वेळेवर माहिती देण्यात आली होती.त्यातच या जिल्ह्यात थांबायचे नाही,कुणाशी बोलायचे नाही अशी भूमिका बांधून आलेले बांधकाम मंत्र्यांनी प्रसारमाध्यमांनाही महत्व देण्याचे टाळले.गोंदियात आगमन होण्यापुर्वी त्यांनी अर्जुनीमोरगाव ते वडसा रस्त्यावरील खड्डे भरण्याचे सुरु असलेल्या कामाची पाहणीनंतर त्या कामाने किती समाधानी मंत्री झाले हे त्या विभागाच्या कार्यकारी अभियंत्याशिवाय कुणालाच ठाऊक नाही.विशेष म्हणजे कंत्राटदारांनी गेल्या काही महिन्यापासून आंदोलन उभारले होते,त्यामुळे गोंदियातही ते कंत्राटदारांशी चर्चा करतील अशी अपेक्षा होती,ती सुध्दा फोल ठरली.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात बांधकाम विभागाच्या अधिकाèयांशी संवाद साधून आढावा घेतला तेव्हा पालकमंत्री राजकुमार बडोले,आमदार गोपालदास अग्रवाल,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपसचिव एफ.एस.मेश्राम,प्रभारी जिल्हाधिकारी व सीईओ रविंद्र ठाकरे,मुख्य अभियंता उल्हास देबडवार,अधिक्षक अभियंता प्रशांत नवघरे उपस्थित होते.यावेळी ६ महिन्यात अधिकारी व कर्मचाèयांची रिक्त पदे व विभागातील अनुकंपा तत्वावरील भरती करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले.खड्डे भरण्याच्या पलिकडचे रस्ते आहेत त्या रस्त्याच्या कामाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करुन मंत्रालयात पाठविण्याचे निर्देश दिले.
रस्ते कोणतेही असले तरी त्या रस्त्यावरील खड्डे भरले गेले पाहिजे.कामे करतांना सामाजिक बांधिलकी जोपासावे असे आवाहन केले.
पालकमंत्री बडोलेनी मात्र राष्ट्रीय महामार्गावर खड्डे पडल्याने रस्ते खराब झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.या रस्त्यांच्या साईडिंग व्यवस्थित भरण्यात न आल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आणून दिले.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग क्र.१ च्या कार्यकारी अभियंता सोनाली चव्हाण यांनी १७३ कि.मी. लांबीची ११ कामे ५०५४ या अंतर्गत करण्यात येणार आहेत.तसेच तीन वर्षात पूर्ण करण्यात आलेल्या पुलांच्या, इमारतीच्या बांधकामाची तसेच प्रगतीपथावर असलेल्या कामाची माहिती दिली.बांधकाम विभाग क्र.२ चे कार्यकारी अभियंता हेमंत गाणार यांनी अड्याळ-दिघोरी-बोंडगाव-नवेगावबांध ते चिचगड रस्त्याचे काम केंद्रीय मार्ग निधीतून ९० टक्के पूर्ण झाले आहे. द्विवार्षिक रस्ते दुरुस्तीची कामे व कामाच्या प्रगतीबाबत तसेच रिक्त पदांबाबतची माहिती दिली.राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती साखरवाडे,जि.प.कार्यकारी अभियंता वैरागकर,उपकार्यकारी अभियंता श्री.भोपे, उपविभागीय अभियंता श्री.ढोमणे,श्री.निमकर,प्रकाश ताकसांडे, प्रकाश लांजेवार,विजय सोनुने,रुपचंद वासनिक,दिनेश नंदनवार,श्री.गणगे,प्रविण सुमंत,श्री.साहू,श्री.माटे तसेच दोन्ही सार्वजनिक बांधकाम विभागातील शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंते व सहायक अभियंते यावेळी उपस्थित होते.