भारतीय संविधान म्हणजे देशाचा आत्मा – डाॅ. खोब्रागडे

0
17

अहेरी,दि.26 :- “भारतात विविधता आहे या विविधतेत सुध्दा एकता आहे आज भारत देश एकसंघ आहे सर्व जगात भारत देशाला आज जे मानाचे स्थान आहे व देश आज जे विकासाच्या वाटेवर आहे ते केवळ भारतीय संविधानामुळेच या देशात जी लोकशाही व धर्मनिरपेक्षता टिकुन आहे ते केवळ संविधानामुळेच म्हणून भारतीय संविधान म्हणजे या देशाचा आत्मा आहे.” असे मार्गदर्शन आंबेकरी विचारवंत डॉ. नामदेव खोब्रागडे यांनी केले ते धर्मराव  कृषी विद्यालयात ब्लूज युवक संघा तर्फ आयोजित संविधान दिवस कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. उदयप्रकाश गलबले हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ. नामदेव खोब्रागडे, प्रमुख उपस्थिती अॅड संघरत्न कुंभारे, माजी उपसभापती सुखदेव दुर्योधन, ए.आर.खान, प्रकाश दुर्गे, रंगय्या रेपाकवार, प्रतिक मुधोळकर, सोपान कवडे आदिंची होती.
“रात्र वैऱ्याची आहे संविधान बदलायचा घाट घातल्या जात आहे.” सर्व स्तरातील लोकांना एकसंघ ठेवून धर्मनिरपेक्षता, लोकशाही या तत्वावर तसेच समानता, स्वातंत्र्यता, बंधुता, या मुल्यावर  आधारलेल्या बाबासाहेबाच्या संविधानाला पायदळी तुळविल्या जात आहे. शासनात असलेल्या राज्यकर्ते लोकांनी आरक्षनापासून तर नौकऱ्यातील बरत्या थांबविण्यासाठीचा घाट घातला जात आहे म्हणून सर्व भारतीयांनी आता जागरुक होऊन संविधान वाचवण्यासाठी पुढे यायला हवे असे उपस्थितीतांना मार्गदर्शन डाॅ. खोब्रागडे यांनी केले.याप्रसंगी अॅड. उदयप्रकाश गलबले, अॅड संघरत्न कुंभारे, ए.आर.खान. यांनी भारतीय संविधान या विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक सुनतकर यांनी केले. संचालन आनंद अलोने यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार रोशन कुंभारे यांनी माणले या कार्यक्रमाला अहेरी व आलापल्ली येथील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी ब्लूज चे चेतन अलोने, भारत गलबले, शहिद सुनतकर, पृथ्वीराज जुनघरे, प्रफुल्ल दुर्गे, खुशाल डोंगरे व सर्व ब्लूज चे सर्व सभासदांचे सहकार्य मिळाले.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नानाजी शामकुळे यांनी केले अभिवादन

चंद्रपूरः- येथे सविंधान दिनानिमीत्‍त भारतीय जनता पार्टीतर्फे चंद्रपूरातील गिरनार चौक येथुन रॅली काढण्‍यात आली. या रॅलीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आ. नानाजी शामकुळे,उपमहापौर अनिल फुलझेले, मनपाचे स्‍थायी समिती सभापती राहूल पावडे, भाजपा नेते राजेश मुन, मनपा सदस्‍य सुभाष कासनगोट्रटूवार,  देवानंद वाढई, सौ. आशा आबोजवार, सौ. माया उईके, सौ. शिला चव्‍हाण, सौ. शितल गुरनुले, सौ. वनिता डुकरे, सौ. वंदना जांभुळकर, अंकुश सावसाकडे, सौ. चंद्रकला सोयाम, सौ. जयश्री जुमडे, संदीप आवारी, अॅड. राहूल घोटेकर, सौ. छबुताई वैरागडे, रवी आसवानी, सौ. राखी कंचर्लावार, सौ. सविता कांबळे, सौ. वंदना तिखे, प्रशांत चौधरी, कु. शितल कुळमेथे, राजेंद्र अडपेवार, संजय कंचर्लावार, सौ. अनुराधा हजारे, सौ. खुशबु चौधरी, वसंता देशमुख, सौ. संगीता खांडेकर, सौ. ज्‍योती गेडाम, सौ. कल्‍पना बगुलकर, सौ. निलम आक्‍केवार, स्मिता नंदनवार, वर्षा कोठेकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.स्‍थानिक आंबेडकर चौकात ही रॅली विसर्जीत झाली. ना. सुधीर मुनगंटीवार, आ. नानाजी शामकुळे यांनी भारतरत्‍न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या पुतळयाला पुष्‍पहार अर्पण करून त्‍यांना अभिवादन केले.नागपूर येथे रेलवेच्या कार्यालय परिसरातही सविंधान दिवस साजरा करण्यात आला.