अदानी प्रकल्पाच्या कामकाजात अडथळा निर्माण कऱणार्यावर गुन्हा दाखल

0
15

गोंदिया,दि.27 : येथील अदानी विद्युत प्रकल्पात परप्रांतातून कामगार आणून स्थानिक कामगारांना रोजगारापासून वंचित ठेवण्याच्या धोरणाविरूद्ध आंदोलन करणार्या माजी आमदार हरिष मोरे यांच्या श्रमिक कामगार संघाच्या अध्यक्ष, सचिवासह १२ जणांवर विविध कलमान्वये तिरोडा पोलिसानी गुन्हे दाखल केले आहेत.विशेष म्हणजे माजी आमदार हरिष मोरे यांनी जेव्हापासून अदानी प्रकल्प सुरु झाला तेव्हापासून कधीच आंदोलन केले नाही.मात्र गेल्या पाच सहा महिन्यापासून त्यांना परप्रांतिय मजुरांचा ्दवेष व जिल्ह्यातील मंजुरांची आठवण झाल्याचेही प्रकर्षाने दिसून आले.२६ नोव्हेंबरला अदानी पॉवर प्रकल्प परिसरात श्रमिक संघाच्या काही लोकांनी अदानीत कामावर असलेल्या परप्रांतीय मजुरांना हाकलून लावत आंदोलनात्मक भूमिका घेतल्याने परिस्थिती बिघडली होती. त्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रकल्पाचे सुरक्षा विभागाचे विश्वजीत गोदावरी प्रधान यांच्या तक्रारीवरून  अदानी प्रकल्पाच्या कामात अडथळा निर्माण केल्याबद्ल तिरोडा पोलिसांनी भादंवि कलम ३४१, १०९, १४३, १९८४ चे कलम ३ (२) अ तसेच फौजदारी कायदा १९३२ चे कलम ७ नुसार प्रकल्पाच्या आतील कोळसा विभागातील १० कामगारांनी काम बंद केल्याने विद्युत उत्पादनात अडथळा निर्माण झाल्याने तसेच कामगार न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन झाल्याने पुरनवन थावकर (२८), संतोष बिसेन (३६), मिलींद हरिणखेडे (२८), प्रफुल मानकर (३४), राकेश कडव (३०), निकेश पटले (२४), छबीलाल सेलोकर (३२), विलास नागदेवे (३५), नितेश ढोंबरे (३०), मुकेश ढोंबरे (३३) या कर्मचाºयांसह संघटनेचे अध्यक्ष हरिष मोरे, सचिव ओमप्रकाश पटले यांचे विरोधात गुन्हा नोंद दाखल केला आहे.