नागपूर विद्यापीठात ‘यंग टीचर्स’ आघाडीवर

0
13

नागपूर,दि.२८ : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणुकांमध्ये शिक्षण मंच कमाल करणार ही अपेक्षाच शिक्षित मतदारांनी फोल ठरवत प्राचार्य डॉ. बबन तायवाडे यांच्या नेतृत्वातील ‘यंग टीचर्स असोसिएशनङ्कचा दबदबा कायम राहिला. विधिसभा तसेच विद्वत्तपरिषदेत ‘यंग टीचर्सङ्कचे सर्वात जास्त उमेदवार निवडून आले. तर त्याखालोखाल अभिजित वंजारी यांच्या नेतृत्वातील ‘सेक्युलर पॅनलङ्कनेदेखील चांगली कामगिरी केली. संपूर्ण ताकदीने निवडणुकांत उतरलेल्या शिक्षण मंचाला मात्र अपयशाचा सामना करावा लागला.
नागपूर विद्यापीठाच्या सिनेट-विद्वत्तपरिषद आणि अभ्यास मंडळासाठी शनिवारी ९२.८२ टक्के मतदान झाले. सात वर्षानंतर झालेल्या या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याने उमेदवारांचे ठोकेही वाढले होते. विधिसभेच्या २९, विद्वत्तपरिषदेच्या ८ आणि ५२ अभ्यास मंडळाच्या प्रत्येकी ३ जागांसाठी सोमवारी मतमोजणी झाली.प्राचार्य गटासाठी यंग टिचर्सकडून खुल्या प्रवर्गात डॉ.एन. आर. दीक्षित, डॉ. संजय धनवटे, ओबीसी -डॉ.विनोद गावंडे, अनुसूचित जाती -डॉ. पी. सी. पवार, महिला प्रवर्ग – डॉ. शरयू तायवाडे. सेक्युलर पॅनल – डॉ. मृत्युंजय सिंग, डॉ. विवेक नानोटी, अनुसूचित जमाती – डॉ. चेतन मसराम. विद्यापीठ शिक्षण मंच – डॉ. उर्मिला डबीर आदींचा विजयी उमेदवारामध्ये समावेश आहे..
विधिसभेत प्राचार्य गटात यंग टीचर्स असोसिएशनचे ५ उमेदवार निवडून आले. तर विद्यापीठ शिक्षक गट आणि व्यवस्थापन प्रतिनिधी गटात प्रत्येकी २ उमेदवार निवडून आले. तर ‘सेक्युलर पॅनलङ्कने ७ जागांवर यश मिळविले. शिक्षण मंचाच्या पदरात २ जागा पडल्या.
विधिसभेतील प्राचार्य व व्यवस्थापन प्रतिनिधी गटात बलाढ्य उमेदवार होते. प्राचार्य गटात नरेंद्रसिंह दीक्षित यांनी पहिल्याच फेरीत विजयी मतांचा ‘कोटाङ्क पूर्ण केला. तर विवेक नानोटी यांनी तिसèया व संजय धनवटे यांना पाचव्या फेरीत विजय मिळाला. व्यवस्थापन प्रतिनिधी गटात डॉ. बबन तायवाडे यांनी पहिल्याच फेरीत ५० मते घेत ‘कोटाङ्क पूर्ण केला. दुष्यंत चतुर्वेदी यांना दुसèया फेरीत तर आर. जी. भोयर यांना चौथ्या व अखेरच्या फेरीत विजय मिळाला.
विज्ञान व तंत्रज्ञान शाखेतील ‘फार्मास्युटिकल सायन्सङ्क अभ्यास मंडळाच्या मतमोजणीदरम्यान गोंधळ झाला. नितीन उंदीरवाडे व धर्मेंद्र मुंधडा यांना सारखी मते पडल्याने ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली. कुलसचिवांनी ही चिठ्ठी काढली. मात्र याला ‘सेक्युलर पॅनलङ्कचे डॉ.डी.के.अग्रवाल यांनी आक्षेप घेतला. नियमानुसार ही ईश्वरचिठ्ठी काढण्यात आली नसल्याचा त्यांनी दावा केला. अखेर कुलगुरूंकडे हा आक्षेप नोंदविण्यात आला.
सेक्युलर पॅनलला खिंडार पाडत शिक्षण मंचाने तेथील काही प्राध्यापकांना आपल्या गटात सामील करून घेण्यात यश मिळविले होते. मात्र त्यांचा हा प्रयत्न फारसा यशस्वी ठरला नाही. विद्यापीठ शिक्षक गटातून विधिसभेत राजेंद्र काकडे दमदार कामगिरी करतील, अशी अपेक्षा होती. मात्र सेक्युलर पॅनलचे उमेदवार ओमप्रकाश चिमणकर यांनी त्यांचा पराभव केला. काकडे हे या गटात अखेरच्या स्थानी राहिले.