घरकुल योजनेतील प्रपत्र ब च्या लाभार्थ्यानी २५ डिसेबरपुर्वी नोंदणी करा-बीडीओ हरिणखेडे

0
33

गोरेगाव,दि.२ :- प्रधानमंत्री आवास योजना ग्रामिण अंतर्गत  प्रपत्र ‘ब’ नुसार तालुक्यात नऊ हजार ११२ लाभार्थी संख्या आहे  या सर्वांची नोंदणीचे  कार्य पंचायत समिती स्तरावर सुरु झाले असल्याने लाभार्थ्यानी संमधीत ग्रामपंचायतीला आधारकार्ड, जाबकार्ड, राष्टीयकूत बँकेचे खाते क्रमांकची सत्य प्रत , मोबाईल क्रमांक त्वरीत देण्यात यावे  व सदर नोंदणी २५ डिसेबरपुर्वी करण्यात यावी
तालुक्याला २०१७-१८ या वर्षाकरीता ८२८ घरकुलाचे लक्षांक मिळाले असुन मंजुरी मिळुन काम सुरु करावयाचे आहे यात अनुसुचित जाती करीता १७९ घरकुल, अनुसुचित जमातीकरीता १३५ घरकुल, इतर जातीकरीता ५१० घरकुल, अल्पसंख्याक करीता ०४ असे ८२८ घरकुल मंजुरी मिळाली आहे  त्याच प्रमाणे २०१६-१७ व त्याअगोदरचे घरकुलाचे सर्व  अपुर्ण कामे  पुर्ण करणे आहे
प्रपत्र ब’ मध्ये येणा-या घरकुल लाभार्थी अनुसुचित जाती ६०५ , अनुसुचित जमाती ९६०, अल्पसंख्याक ०४, इतर ७५४६ लाभार्थी पात्र आहेत यांना लाभ देण्यासाठी युध्दस्तरावर नोंदणीचे कामे सुरु करण्यात आले आहेत प्रपत्र ब’ मध्ये नाव असलेले पण अत्यंत गरजु घर पडलेले असलेले ज्यांचे नाव शेवटी अाहे त्यांनी ग्रामपंचायत किवा पंचायत समितीला अर्ज सादर करावे व घरकुलाचे लाभ घ्यावे  रमाई आवास योजना, सबरी आवास योजना अंतर्गत प्रपत्र ड’ मध्ये असलेले  किवा अवधानाने नाव सुटलेल्या सर्व लाभार्थ्यानी आपआपल्या ग्रामपंचायती मध्ये नोंदी कराव्या असे आवाहन गटविकास अधिकारी दिनेश हरिणखेडे  व सहाय्यक अभियंता ओ. सी. खोपे यांनी केले आहे