राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तहसील कार्यालयावर मोर्चा

0
4

सडक अर्जुनी,दि.09ः- तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा या प्रमुख मागणीसह घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर (दि.७) दुपारी १ वाजता माजी आ. दिलीप बन्सोड, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मनोहरराव चंद्रिकापुरे, जि. प. गटनेता गंगाधर परशुरामकर,अविनाश काशीवार किशोर तरोणे, रमेश चुर्‍हे,मिलन राऊत,छायाताई चव्हाण,हिरालाल चव्हाण,सचिन रहांगडाले, यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, प्रमुख मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मेर्शाम यांच्यामार्फत मुख्यंत्र्यांना पाठविण्यात आले.
जिल्ह्यात यंदा कमी पाऊस पडला असून तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतामधील रोवणे झाले नाही. नापिकीमुळे शेतकरी हतबल झाले आहेत. ज्यांचे रोवणीचे काम पूर्ण झाले त्या पिकाला किडीच्या प्रादुभार्वामुळे नष्ट केले आहे. त्यामुळे तालुका पूर्णत: दुष्काळ घोषित करण्यात यावा या प्रमुख मागणीसह शासनाने जाहीर केलेली छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकर्‍यांना मिळाला नसल्याने सर्व शेतकर्‍यांचे पीक कर्ज व मध्यम मुदती कर्ज सरसकट माफ करण्यात यावे, धान उत्पादक शेतकर्‍यांना उत्पादन खर्चाच्या दिडपट भाव देण्यात यावा, धान उत्पादक शेतकर्‍यांना ३00 रुपये प्रति क्विंटल बोनस देण्यात यावे, कृषिपंपाचे विद्युत बिल सरसकट माफ करण्यात यावे, पंतप्रधान पीक विमा योजनेचा शेतकर्‍यांना तातडीने लाभ देण्यात यावा, किडीच्या प्रादुभार्वाने ज्या शेतकर्‍यांचे नुकसान झाले त्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, मग्रारोहयोची कामे तातडीने सुरू करून शेतकरी, शेतमजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात यावे, आणेवारीची अट रद्द करण्यात यावी, शेतकरी-शेतमजूर, विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेता तलाठ्यांना दाखले देण्याचे आदेश देण्यात यावे, कृषी उत्पन्न बाजार समितीस शासकीय जागा त्वरित उपलब्ध करून देण्यात यावी यासह इतर मागण्यांची पूर्तता त्वरित करण्यात यावी याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मोच्र्याचेआयोजन करण्यात आले होते. मोच्यार्ची सुरुवात त्रिवेणी हायस्कूल येथून करण्यात आली. मोच्र्यात बैलबंडीसह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, प्रमुख मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार मेर्शाम यांना देण्यात आले.