स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी 11 डिसेंबरला ‘विदर्भ बंद’

0
8

गडचिरोली,दि. ९ : नागपूर करार करुन विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करुन घेतले. मात्र कराराचे पालन राज्य शासनाकडून करण्यात आले नाही. यामुळे विदर्भ नेहमीच पिछाडीवर राहिलेला आहे. मात्र आता विदर्भवाद्यांनी जागे होत विदर्भावरील अन्याय दुर सारण्यासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य तसेच शेतकर्यांच्या प्रश्नांना घेउुन ११ डिसेंबर रोजी विदर्भ बंद ठेवण्यात येणार आहे. याच दिवशी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्याने महारष्ट्र सरकारच्या नागपूर अधिवेशनावर बहिष्कार टाकण्यात येणार असून या आंदोलनात विदर्भवाद्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या पदाधिकारी आज आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे.
पत्रकार परिषदेत माहिती देतांना समितीचे पदाधिकार्यांनी म्हटले आहे की, आजपर्यंत सर्वच सरकारांनी विदर्भावर अन्याय केला आहे. विदर्भाला २८ सप्टेंबर १९५३ ला महाराष्ट्रात सामील करुन घेतले. तेव्हापासूनच वैदर्भिय जनतेवर अन्याय सुरु झाला. महाराष्ट्र सरकारने कराराचे पान केल्यामुळे विदर्भात सिंचन, रस्ते, आरोग्य, शिक्षण, उद्योग, रोजगार सरकारी नोकर्या, वीज पुरवठा, सहकार या सर्व क्षेत्रात प्रचंड न भरुन निघणारा अनुशेष निर्माण झाला आहे. विदर्भातील युवकांच्या हक्कांच्या ४ लाख नोकर्या पळविण्यात आल्या, सिंचनाचे १ लाख कोटी, रस्त्याचे ५० हजार कोटी पळविण्यात आले, तीन वर्षात सरकारने २.५० लाख कोटीचे कर्ज घेतले मात्र यातील किती कोटी निधी विदर्भाकरीता खर्च करण्यात आला, असा सवालही समितीच्या पदाधिकार्यांनी यावेळी उपस्थित करीत विदर्भाचा मागासलेपणा वाढविण्यात महाराष्ट्र सरकारची भूमिका असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.
विदर्भावारील महाराष्ट्र सरकारने केलेला अन्याय दूर करण्यासाठीच ११ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाचे पहिल्या दिवशी विदर्भ बंद चे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे. सदर आंदोलनादरम्यान जिल्ह्यासह तालुका, गणपतीवर चक्काजाम, बंद पुकारण्यात येत असून या आंदोलनात स्वयंप्रेरणेने वैदर्भिय जनतेने सहभागी होण्याचे आवाहन पदाधिकार्यांनी केले. या आंदोलनादरम्यान जिल्हाभरातही चक्काजाम आंदोलन पुकारण्यात आले असून तालुका तसेच गावपातळीवर सदर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले असून या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन समितीच्या पदाधिकार्यांनी केले.
पत्रकार परिषदेला विदर्भ राज्य चंद्रशेखर भडांगे, अरुण पा. मुनघाटे, चंद्रशेखर भडांगे, अमिता मडावी, रुचित वांढरे, पांडूरंग घोटेकर, ब्राम्हणवाडे, डी. डी. सोनटक्के, जनार्धन साखरे, रमेश उप्प्लवार, डी. एन. बर्लावार, विवेक बाबनवाडे, दादाजी चुधरी आदींसह विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्हा शाखा गडचिरोलीचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.