पुनर्वसित भागाला ‘श्रीरामपूर’ नाव द्या – प्रकल्पग्रस्तांची मागणी

0
13

गोरेगाव,दि.१७ः-  तालुक्यातील कलपाथरी मध्यम प्रकल्पात गेलेल्या सोनारटोला, भगतटोला व आकोटोला या तिन्ही गावांचे २00६ मध्ये पुनर्वसन गोरेगाव नगर पंचायत हद्दित करण्यात आले.२0१५ या वर्षी पुनर्वसित क्षेत्राला प्रभाग क्र. १ मध्ये समाविष्ट करण्यात आले. या पुनर्वसित क्षेत्राला या पुनर्वसित भागाला ‘श्रीरामपूर’ पूनर्वसन नाव देण्यात यावे, या आशयाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.
निवेदनानुसार, पुनर्वसनाच्या नियोजित जागेला गावठाण घोषित करून श्रीरामपूर नाव देण्यात यावे. भूखंडाखालील क्षेत्रफळ, खुली जागा, सार्वजनिक उपयोगी जागा, सामाजिक वनीकरण्याची जागा, सामाजिक वनीकरणाची जागा, स्मशानभूमी रस्त्याखालील एकूण क्षेत्रफळ वेगवेळ्या गटात वेगळे वरून सातबारा तयार करण्यात यावे. प्लॉटधारकांच्या नावे वेगळे आखीव पत्र किंवा सातबारा तयार करण्यात यावे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडी सध्या सोनारटोला या नावाने रेकार्डला आहे. त्यांना श्रीरामपूर पुनर्वसन या नावाने फेरबदल करावे आदी मागण्यांचा समावेश आहे.
तसेच सन २00७ ला पट्टे देण्यात आले होते. मात्र काही लोकांचे यादीमध्ये गाव असताना त्यांना पट्टे देण्यात आले नाही. काही लोकांच्या भूखंडामध्ये फेरबदल करण्यात आले. पण ते बदल करण्यात आले नाही, ते करावे. या मुद्याचाही निवेदनात समावेश आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष डॉ. लक्ष्मण भगत व नगरसेवक रेवेंद्रकुमार बिसेन उपस्थित होते.