पाहुनगाव पुनर्वसनावर वनराज्यमंत्री आत्राम यांच्याशी पटलेंची चर्चा

0
13

भंडारा,दि.२४ः-जिल्ह्यातील पवनी तालुक्यातील पाहुनगावच्या पुनर्वसनासंबंधी वनराज्यमंत्री अमरीश राजे आत्राम यांची माजी खासदार शिशुपाल पटले यांनी भेट घेवून मंत्रालयात चर्चा केली.त्यासाठी २१ डिसेंबरला मंत्रालयात तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.वनराज्यमंत्री अमरीश राजे आत्राम, विभागाचे सचिव, मुख्य वनसंरक्षक वन्यजीव, मुख्यवनसरंक्षक वने, माजी खासदार शिशुपाल पटले, पाहुनगावचे सरपंच,पोलिस पाटील यांना बैठकीसाठी आमंत्रीत करण्यात आले होते.मागील अनेक वर्षापासून रखडलेला पाहुनगाव पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागण्याची आशा निर्माण झाली असून पाहुनगाव वासीयांनी माजी खासदार शिशुपाल पटले यांचे आभार मानले आहेत. पवनी तालुक्याच्या टोकावर, मरू नदीच्या काठावर आणि पवनी -उमरेड -कèहांडला अभयारण्यात येत असलेल्या पाहुनगावचे पुनर्वसन करण्याच्या मागणीचे ग्रामवासीयांतर्फे निवेदन स्थानिक विश्राम भवनात माजी खासदार शिशुपाल पटले यांना ८ डिसेंबर रोजी देण्यात आले होते. पाहुनगावचे पोलिस पाटील नरेश कुरूडकर,आनंद माहुरे, उपसरपंच शंकर महाजन,पवनी येथील भाजप नेते अरूण आसई,विपीन तलमले यावेळी उपस्थित होते.