भारतरत्न अटलजींच्या वाढदिवशी मॅराथॉन दौड व रक्तदान शिबीर

0
11
-गरजूंना ब्लॅकेटचे वाटप
गोंदिया,दि.26 : भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर वॉर्ड, मुर्री रोड येथील वाजपेयी चौकात २५ डिसेंबर रोजी ‘सुशासन दिनी’ भव्य ओपन मॅराथॉन दौड व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
पहाटेपासून युवकांनी मोठ्या प्रमाणात मॅराथॉन दौडमध्ये सहभागी होण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सकाळी सात वाजता भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ केला. यावेळी माजी खा. डॉ. खुशाल बोपचे, भाजपा माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपाध्यक्ष शिव शर्मा, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, संतोष चव्हाण, भाजपा शहराध्यक्ष सुनिल केलनका, न.प.सभापती भावना कदम, घनश्याम पानतावने, दिलीप गोपलानी, जि.प.सदस्य शैलजा सोनवाने, संजय कुळकर्णी, नगरसेविका निर्मला मिश्रा, वर्षा खरोले, विवेक मिश्रा, जयंत शुक्ला, मुन्ना भारव्दाज, दीपक कदम, दिनेश मिश्रा, विनोद किराड,  धमेंद्र डोहरे, बाबा बिसेन, कमलेश सोनवाने, अशोक हरिणखेडे, राजा कदम, डॉ. तिलकचंद धुवारे, प्रविण सोनवाने प्रामुख्याने उपस्थित होते. सदर आयोजन सुधीर कायरकर, भाजपा जिल्हा सचिव हंसू वासनिक, शहर उपाध्यक्ष राजु पटले, दारा बैरिसाल व कार्यकर्त्यांनी यशस्वीरित्या केले.
जिल्ह्यातील शेकडो युवक सहभागी झालेल्या या ११ किलोमीटरच्या दौडमध्ये ११ हजाराचा प्रथम पुरस्कार सुशिल रहांगडाले यांनी पटकाविला. सात हजाराचा व्दितीय पुरस्कार सुभाष लिल्हारे, पाच हजाराचा तृतीय पुरस्कार आशिष नागपुरे, तीन हजाराचा चौथा पुरस्कार गुरूदेव दमाहे, एक हजार एक रूपयाचा पाचवा पुरस्कार राजेंद्र घासले यांनी पटकाविला. तसेच प्रोत्साहन पुरस्कार रंजीत बोपचे, नितीन खंडरे, उमेश भांडारकर, आकाश भोयर, शैलेश लाडे, लिकेश शिहारे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे संचालन मुकेश हलमारे यांनी केले तर आभार हंसू वासनिक यांनी मानले. आयोजकांनी न.प.प्रशासन व वाहतूक पोलिसांचे विशेष आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. तिलकचंद धुवारे, प्रविण सोनवाने, दिलीप मेश्राम, राहूल पाराशर,पप्पू कनोजिया, प्रशांत गुडगे, छोटू उपाध्याय, अमन पुरोहित, सतीश धोटे, चिंटू सोनपुरे, दीपक हलमारे, मुन्ना उरकुडे, लाला लाखा, तनय बाचकवार, अंकीत पटले, प्रजेत पटले, महेश वरघडे, दिनेश दीहारी, बबलू राणे, गुरूदत्त चौधरी, श्रीचंद राणे आदींनी परिश्रम घेतले.
दरम्यान, मुर्री रोड,  चंद्रशेखर वॉर्डात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रविण सोनवाने, पप्पू कनोजिया, धमेंद्र डोहळे, छाया पुरोहित, नगरसेविका वर्षा खरोले, जि.प.सदस्या शैलजा सोनवाने आदीसह कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेकरीता रक्त संकलन पेढीच्या कर्मचाºयांनी सहकार्य केले. भारतरत्न वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात ठिकठिकाणी गरजूंना ब्लॅकेटचे वाटपही करण्यात आले.