पुण्यस्मरणानिमित्त रुग्णालयात फळवितरण

0
13

तिरोडा,दि.28:येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापयी वाय.टी.क़टरे यांच्यावतीने आज २८ डिसेंबर रोजी स्व. विद्या कटरे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त रुग्णांना फळ वितरण, विद्याथ्र्यांना नोटबूक वितरण करण्यात आले.तिरोडा येथील चलतीबाई उपजिल्हा रुग्णालयात व सुकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले.सोबत खैरबोड़ी येथील शाळेंच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालात माजी सभापती वाय.टी.कटरे,रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी डाॅ.कंचन रहागंडाले यांच्यासह इतर मंडळी उपस्थित होते.दरम्यान तुषार सूर्यवंशी यांच्या किर्तनाचे आयोजन सायंकाळी ५ वाजता करण्यात आले आहे. या कार्यक़्रमााच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजेंद्र जैन, तर उद्घाटन आमदार विजय रहांगडाले ायंच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाला माजी आमदार दिलीप बन्सोड, नगराध्यक्ष सोनाली देशापांडे, सुनील पालाांदूरकर, उषा qकदरले, राजलक्ष्मी तुरकर, पंचम बिसेन, डॉ. किशोर पारधी, कैलास पटले, प्रिती रामटेके, रजनी कुंभरे, जावेद ईनामदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.