राष्ट्रीय ओबीसी महासंघ,दक्षिण व पूर्व विधानसभा नागपूर संयुक्त मेळावा १० मार्चला -डॉ. तायवाडे

0
10

नागपूर,दि.15 : राष्ट्रीय आे.बी.सी.महासंघ तर्फे सभा (दि.१२) दिघोरी रोड ,येथे ओबीसी महासंघाचे शहर कार्याध्यक्ष शकील पटेल यांच्या जनसंपर्क कार्यालया मध्ये सपंन्न झाली.सभेत येत्या १० मार्च ला दक्षिण-पूर्व विधान सभा स्तरावर भव्य मेळावा घेण्याचा निर्णय झाला.या मेळाव्यात आेबीसींच्या शैक्षणिक, सामाजिक प्रश्नावर राज्यातील आे.बी.सी वक्त्यांतर्फे प्रबोधन करण्यात येईल. प्रमुख मागण्या व ओबीसी कोण यांचा इतिहास काय या विषयांवर जास्तीत जास्त लक्ष देणे गरजेचे आहे,वाढत चाललेला जनतेचा विश्वास व राष्ट्रीय ओबीसी महासंघाची स्तुस्यास्पद प्रगती हि आपल्या संघटनेला मिळालेली अभिमानाची पावती आहे . समस्त ओबीसी वर्गाचे मानसिक प्रबोधन करून त्यांना लढ्यासाठी मानसिक बळकट बनवणे यावर आपण काम करणार आहो,त्या अनुषंघाने येत्या १० मार्च २०१८ रोजी होणाऱ्या संयुक्त दक्षिण-पूर्व ओबीसी मेळाव्याला जास्तीत जास्त लोकांनी यावे अशी विनंती राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संयोजक डॉ.बबनराव तायवाडे यांनि केली.
बैठकीचे संचालन समन्वयक शरद वानखेडे तर आभार प्रदर्शन संजय पन्नासे यांनी केले.तेव्हा प्रामुख्याने गिरीश पांडव,जयंतराव लूटे,मदन नागपूरे,डॉ.रामेश्वर पाठेकर,गोंविद वरवाडे ,पंकज पांडे,राजू खडसे,पराग वानखेडे,प्रशांत रिंके,आकाश जावळे ,राजेंद्र पाटील,क्रिष्णा गोतमारे, विकास गौर,गुणेश्वर अरिकार,राजू बोबटे,भैया रडके, प्रदीप महाजन,भोयर,तालेकर,सचिन ढोक,यशवंत कुथे,शाहीद रजा,मोहंमद येतेशामुद्दीन,अब्दुल ऐजाज, सुरेंद्र बुराडे,राम पाठेकर, विजय पटले, व्यवहारे,करजारे, शेख,आरिफ हुमायू, गणेश नाखले, अरुण गायकवाड,जाकिर अहमद,राऊत, नारायण लडके ,राजू बोपाटे, मंगेश शहाणे,रुपेश धोटे,शेहजाद शेख,मंगेश पांगुळ,नितीन देशमुख,रवी उमक,निलेश खोडगाडे,चक्रधर,सरदार खान,नरेंद्र वरवडे,शकील कुरेशी,विनोद उलीपवर,इरफान खान,अतुल्हा खान,वसीम शेख,मोरेश्वर जाधव,देविदास देशमुख सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्त्थित होते.