विधानमंडळअनुसूचित जमाती कल्याण समितीची पिपरिया दुरक्षेत्र केंद्राला भेट

0
11

गोंदिया,दि.१९ : विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने १९ जानेवारी रोजी जिल्ह्यात दौरा करुन आदिवासी बांधवांचे वास्तव्य असलेल्या भागात करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी करुन आदिवासी लाभाथ्र्यांशी संवाद साधला.तसेच पिपरिया येथील सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र केंद्राला देखील समितीने भेट देवून नक्षलप्रभावित भागात कोणत्याप्रकारे या केंद्राच्या वतीने काम करण्यात येते याची माहिती देखील समितीने घेतली. पिपरिया भागातील बेरोजगार १०० युवक-युवतींना पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण देण्यात येत असल्याची माहिती केंद्राचे सहायक पोलीस निरिक्षक नितीन सावंत यांनी यावेळी दिली. या केंद्रात असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्ग, त्याचप्रमाणे नक्षलवादाचा विमोड करण्यासाठी पोलीस विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती श्री.सावंत यांनी दिली. जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी या भागात पोलीस व वन विभागाकडे डड्ढोनची आवश्यकता असल्याचे सांगून त्याची उपयुक्तता विशद केली.यावेळी समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक उईके यांच्यासह समितीचे सदस्य आमदार सर्वश्री प्रभुदास भिलावेकर, पास्कल धनारे, पांढूरंग बरोरा, आनंद ठाकुर, श्रीकांत देशपांडे व जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे,प्रकल्प अधिकारी विनोद चौधरी,बांधकाम विभाग,वनविभाग,जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.